शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
3
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
4
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
5
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
8
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
9
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
11
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
12
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
13
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
14
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
15
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
16
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
17
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
18
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
19
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
20
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका

पुन्हा 13 जणांचा मृत्यू; काेराेनाबाधितांचा नवा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 05:00 IST

मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. दरदिवशी १० ते १५ रुग्णांचा मृत्यू हाेत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील विषाणू आक्रमक आहे. त्यामुळे पूर्वीच्या लाटेच्या तुलनेत मृतकांची संख्या आता अधिक आहे. तसेच संसर्ग हाेण्याचे प्रमाणही अधिक आहे. एकाच दिवशी ४०० ते ५०० नागरिक काेराेनाबाधित हाेत आहेत. असे असतानाही नागरिक रस्त्यांवर अनावश्यक फिरत आहेत.

ठळक मुद्दे३ हजार १०४ रुग्ण दवाखान्यात भरती; एकूण रूग्णसंख्या १५ हजारांवर

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनामुळे मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. रविवारी एकाच दिवशी १३ जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला, तर काेराेनाबाधितांच्या संख्येनेही रविवारी उच्चांक गाठत एकाच दिवशी ५२४ जण बाधित झाले. २२६ जणांनी काेराेनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १५ हजार ९ झाली आहे. सध्या ३ हजार १०४ काेराेनाबाधित रुग्णालया उपचार घेत आहेत. जिल्ह्यात एकूण २१३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. रविवारी १३ नवीन मृत्यूमध्ये गडचिराेली जवळील नवेगाव येथील ७२ वर्षीय पुरुष, मुलचेरा येथील ५० वर्षीय महिला, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर येथील ५८ वर्षीय पुरुष, गडचिराेली शहरातील रामनगर येथील ५२ वर्षीय पुरुष, स्नेहनगरातील ५० वर्षीय महिला, सर्वाेदय वाॅर्डातील ६५ वर्षीय पुरुष, भंडारा जिल्ह्यातील  लाखांदूर येथील ५८ वर्षीय पुरुष, देसाईगंज येथील ६२ वर्षीय पुरुष, अहेरी येथील ६९ वर्षीय पुरुष, ५७ वर्षीय पुरुष,  चिमुर येथील ६२ वर्षीय पुरुष, काेरचीतील ४५ वर्षीय पुरुष, भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.नवीन ५२४ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १६९, अहेरी तालुक्यातील ३४, आरमोरी ३८, भामरागड तालुक्यातील १९, चामोर्शी तालुक्यातील ३०, धानोरा तालुक्यातील २७, एटापल्ली तालुक्यातील १६, कोरची तालुक्यातील ३०, कुरखेडा तालुक्यातील ३९, मुलचेरा तालुक्यातील १४, सिरोंचा तालुक्यातील ३०, तर देसाईगंज तालुक्यातील ८८ जणांचा समावेश आहे, तर कोरोनामुक्त झालेल्या २२६ रुग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ११४, अहेरी ११, आरमोरी १६, भामरागड १७, चामोर्शी १५, धानोरा ५, एटापल्ली ९, मुलचेरा ३, सिरोंचा १, कोरची ११, कुरखेडा १३, तसेच देसाईगंज येथील ११ जणांचा समावेश आहे. दिवसेंदिवस काेराेना रूग्णांची संख्या वाढत चालल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.

मृत्यूचे सत्र सुरूच तरीही नागरिक बिनधास्त रस्त्यावर

मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. दरदिवशी १० ते १५ रुग्णांचा मृत्यू हाेत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील विषाणू आक्रमक आहे. त्यामुळे पूर्वीच्या लाटेच्या तुलनेत मृतकांची संख्या आता अधिक आहे. तसेच संसर्ग हाेण्याचे प्रमाणही अधिक आहे. एकाच दिवशी ४०० ते ५०० नागरिक काेराेनाबाधित हाेत आहेत. असे असतानाही नागरिक रस्त्यांवर अनावश्यक फिरत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या