गडचिरोली : गडचिरोली पोलिसांसमोर एका जहाल अतिरेक्याने नुकतेच आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला जबर हादरा बसला आहे. त्याच्यावर अडीच लाख रुपयांचे बक्षीस होते.गोमजी उर्फ अरसू चैतू जेट्टी असे त्याचे नाव आहे. त्याने नक्षलविरोधी अभियानाचे पोलीस महानिरीक्षक शरद शेलार व उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासमोर शरणागती पत्करली. तो २००९मध्ये गट्टा एलओएस दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाला. इंद्रावती जंगल परिसरातील चकमकीसह अन्य गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता.- शासनाच्या आत्मसमर्पण योजनेंतर्गत नक्षलवाद्यांना विविध प्रकारचे लाभ दिले जात आहेत. त्यामुळे या वर्षी आतापर्यंत एक कंपनी सदस्य, एक एरिया कमिटी सदस्य व दलमच्या १७ नक्षल सदस्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामुळे नक्षल चळवळीला जबर हादरा बसला आहे, असे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.
जहाल नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण, वर्षात १९ नक्षलवादी आले शरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 01:25 IST