शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पाच दिवसांची ओली बाळंतीण पुन्हा चालत गेली २३ कि.मी.चे अंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:58 IST

अनेक महिला प्रसुतीनंतर सव्वा महिन्यापर्यंत घराबाहेरही निघत नाही. पण गडचिरोली जिल्ह्यात रोशनीसारख्या अनेक महिलांना प्रसुतीनंतर अवघ्या पाचव्या दिवशी अनेक किलोमीटरची पायपीट करत गाव गाठावे लागते.

ठळक मुद्देप्रसुतीनंतरही ‘त्या’ अभागी मातेचा बाळासह पायीच प्रवासपाचव्या दिवशी निघाली गावाकडेवर्षानुवर्षे कायम असलेल्या व्यथांबद्दल मात्र चीड

रमेश मारगोनवार ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रुग्णालयात सुखरूप प्रसुती व्हावी म्हणून २३ किलोमीटरचे अंतर पायी चालत येऊन त्याच दिवशी प्रसुत झालेल्या अभागी मातेला प्रसुतीनंतर अवघ्या पाचव्या दिवशी पुन्हा पायपीट करत आपले गाव गाठावे लागले. कोणतेही वाहन गावापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने त्याशिवाय दुसरा पर्याय तिच्याकडे नव्हता. आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याची त्या मातेची हिंमत आश्चर्यात टाकणारी आहे. दुसरीकडे विपरित भौगोलिक परिस्थिती आणि कायम दुर्लक्षित अशा नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या व्यथांना अंतच नाही का? अशी संतप्त भावनाही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.भामरागड तालुक्यातल्या बिनागुंडा पलीकडे असलेल्या तुर्रेमर्का येथील रोशनी संतोष पोदाडी या महिलेने गेल्या शुक्रवारी (दि.३) तुर्रेमर्का ते लाहेरीपर्यंत २३ किलोमीटरचा प्रवास पायदळ केल्यानंतर रूग्णवाहिकेने हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या रुग्णालय गाठले आणि त्याच दिवशी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे हे दुसरे बाळंतपण होते. इतक्या लांब पायी चालून येणाऱ्या त्या गरोदर मातेला किमान जाताना प्रसुतीनंतर तरी आरामदायक प्रवास करून गावी जाता येईल असे सर्वांना वाटत होते. पण त्या अभावी मातेला परतीच्या प्रवासातही त्याच पद्धतीने पायपीट करावी लागली.प्रसुतीनंतर पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी (दि.७) रोशनीला सुटी झाली. लोकबिरादरी रुग्णालयाने तिला गावी सोडून देण्यासाठी भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयाला माहिती दिली. तेथून रुग्णवाहिका आली. सोबत डॉ.संभाजी भोकरे हेसुद्धा होते. त्या रुग्णवाहिकेने रोशनीसह तिचे बाळ, कुटुंबातील सदस्य आणि गावाकडून सोबत आलेली आशा सेविका पार्वती उसेंडी निघाले. पण लाहेरीच्या पुढे गुंडेनूर नाल्यापर्यंतच त्यांचे वाहन जाऊ शकले. पुढील १८ किलोमीटरचा प्रवास त्यांना पायीच करावा लागला. विशेष म्हणजे त्यात ७ ते ८ किलोमीटर अंतर हे डोंगरदऱ्यांचे आहे.अनेक महिला प्रसुतीनंतर सव्वा महिन्यापर्यंत घराबाहेरही निघत नाही. पण गडचिरोली जिल्ह्यात रोशनीसारख्या अनेक महिलांना प्रसुतीनंतर अवघ्या पाचव्या दिवशी अनेक किलोमीटरची पायपीट करत गाव गाठावे लागते. या दुर्गम भागातील नागरिकांना विकासाची पहाट कोणत्या जन्मी पहायला मिळणार, अशी भावना नागरिकांमध्ये उमटत आहे. दरवर्षी अनेक महिलांना या परिस्थितीतून जावे लागते. मात्र परिस्थितीमध्ये बदल होत नाही.तारखेआधीच या, सर्व व्यवस्था करणारअनेक महिला प्रसुतीसाठी दिलेल्या तारखेच्या एक दिवस आधीच दवाखान्यात येतात. पण दुर्गम भागामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे कोणत्याही गरोदर महिलेने १० ते १५ दिवस आधीच लोकबिरादरीच्या रुग्णालयात यावे, त्यांची राहण्याची-जेवणाची सर्व व्यवस्था रूग्णालयाकडून केली जाईल, असे आवाहन हेमलकसा येथील लोकबिरादरी रुग्णालयाच्या वतीने डॉ.दिगंत आमटे यांनी केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य