शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

पुरेसे ऑक्सिजन बेड्स आणि औषधी उपलब्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड वाढविणे आवश्यक असल्याचे सांगून त्यासाठी आवश्यक ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प तातडीने बसवून पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. सिरोंचा, देसाईगंज अशा ठिकाणी तातडीने ऑक्सिजन बेड्स वाढवावित असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यातील वाढती रूग्णसंख्या आणि मृत्यूची संख्या प्रशासनासाठी चिंतेचा विषय झाली आहे. विशेष म्हणजे, लाॅकडाऊन असतानाही ही संख्या कमी हाेताना दिसत नाही. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवरचा ताण वाढला आहे.

ठळक मुद्देकोरोना स्थितीच्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांची ग्वाही, मुख्यालयासह तालुक्यातही ऑक्सिजन जनरेटर प्लांट

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे वाढते प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा, बेड्सची नव्याने निर्मिती करण्यासह रेमडेसिविर आणि इतर औषधांच्या पुरवठ्याला तातडीने मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे प्रशासनाला दिली. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शिंदे आले होते. बैठकीनंतर लगेच ते रवाना झाले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यासाठी ऑक्सिजन, रेमडेसिविर व इतर औषधांच्या पुरवठ्यास मंजुरी आणि अतिरिक्त कोट्यासाठी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री तसेच संबंधित  सचिवांकडे दूरध्वनीद्वारे मागणी केली. ही मागणी तातडीने पूर्ण केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड वाढविणे आवश्यक असल्याचे सांगून त्यासाठी आवश्यक ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प तातडीने बसवून पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. सिरोंचा, देसाईगंज अशा ठिकाणी तातडीने ऑक्सिजन बेड्स वाढवावित असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.जिल्ह्यातील वाढती रूग्णसंख्या आणि मृत्यूची संख्या प्रशासनासाठी चिंतेचा विषय झाली आहे. विशेष म्हणजे, लाॅकडाऊन असतानाही ही संख्या कमी हाेताना दिसत नाही. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवरचा ताण वाढला आहे.

२०० रेमडेसिविर आरोग्य विभागाकडे सुपूर्दपालकमंत्र्यांनी यावेळी २०० रेमडेसिविर इंजेक्शन्स आरोग्य विभागाकडे सुपूर्द केली. कोरोना रुग्णांची जास्त औषधे घेण्याची इच्छा असते. मात्र, डॉक्टरांनी आवश्यक असलेल्यांनाच रेमडेसिविर किंवा कोणतेही इतर उपचार द्यावेत. संपूर्ण देशासह राज्यात ऑक्सिजन किंवा रेमडेसिविरसारख्या औषधांचा तुटवडा आहे. उपलब्ध साठा गरजूंना मिळेल यासाठी आरोग्य विभागाने विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याची सूचना त्यांनी केली. 

नगरपालिका व नगर पंचायतींना ५ कोटी कोरोना निधीनगरपालिकांच्या माध्यमातून कोविड नियंत्रणासाठी अनेक प्रकारची कामे होत असतात. शहरात कोविड रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असते. यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्यासाठी पालकमंत्री शिंदे यांनी पाच कोटी रुपये आकस्मिक निधी देण्याचे जाहीर केले. तसेच गडचिरोली शहरातील सेवाभावी डॉक्टरांनी प्रशासनाकडे १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यासाठी आवश्यक निधी नगरपालिका प्रशासनाला उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

तालुका मुख्यालयी ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प

येत्या आठवड्यात गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील २६५ सिलिंडरचा ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प सुरू होत असून दुसरा ऑक्सिजन प्रकल्प १३५ सिलिंडरचा राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी सिंगला यांनी दिली. त्यावर पालकमंत्र्यांनी भविष्यातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन सिरोंचा, आरमोरी, चामोर्शी, कुरखेडा, वडसा, कोरची व एटापल्ली या ठिकाणीसुद्धा कमी क्षमतेचे ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प सुरू करण्याबाबत निर्देश दिले.

ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी तालुकास्तरावर ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटर खरेदी करण्याच्या सूचना केल्या. या ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटरचे वाटप तालुकास्तरावरील कोरोना   रुग्णालयात तातडीने केले जाणार आहे. 

ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटर व रुग्णवाहिकेसाठी आमदारही देणार निधीजिल्ह्यातील आमदारांनी प्रत्येकी एक-एक कोटी रुपये आमदार निधी ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटर व रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर पालकमंत्र्यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. यातून तालुकास्तरावरही ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटर व रुग्णवाहिका महत्त्वाचे योगदान देतील, असे पालकमंत्री म्हणाले. ग्रामीण भागात रूग्ण वाढत असल्यामुळे ऑक्सिजनसह इतर सुविधांची गरज निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या