शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट पीकविमा भराल तर कारवाई; बोगसगिरीला बसणार चाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 14:53 IST

आयुक्तालयाचा प्रस्ताव : जिल्ह्यात एकही प्रकरण नाही

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : बनावट पीकविम्याचा अर्ज निदर्शनास आल्यास कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळू नये म्हणून डीबीटी पोर्टलवर संबंधिताचा आधार क्रमांक ब्लॉक करण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.

पीक विमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी हा नियम असून शासनाच्या मंजुरीनंतर तो लागू होण्याची शक्यता आहे. दरवर्षी बनावट पीक विमा उतरवून योजनेचा लाभ काही शेतकरी घेतात. याचा आर्थिक फटका शासनाला बसतो. कृषी विभागातर्फे कारवाईसुद्धा केली जाते; परंतु दरवर्षी हा प्रकार वाढतच जातो. गडचिरोली जिल्ह्यात बनावट पीक विमा उतरविल्याचे प्रकार अजूनपर्यंत उघडकीस आलेले नसले तरी भविष्यात असे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने कृषी विभाग सतर्क आहे. विशेष म्हणजे, फळबागा असलेल्या जिल्ह्यांमध्ये असे प्रकार उघडकीस आलेले होते. त्यामुळे कृषी आयुक्तालयाने शासनाकडे नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविलेला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास कारवाई होणार आहे.

लाभ मिळत नसल्याने घटली शेतकऱ्यांची संख्या 

  • मागील वर्षीपासून शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजना शासनाने सुरू केलेली आहे. परंतु मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. 
  • यावर्षी विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा जागृती व्हावी.

योजनेच्या लाभासाठी ५ वर्षे बंदी आणणार बनावट पीक विमा उतरवून लाभघेतल्यास व ही बाब उघडकीस आल्यास संबंधित शेतकऱ्याला योजनेच्या लाभापासून ५ वर्षांसाठी वंचित ठेवले जाणार आहे.

बनावट पीकविम्याचे राज्यभर पेव राज्यात अनेक जिल्ह्यांत बनावट पीक विमा उतरविल्याचे प्रकार उघडकीस आलेले होते. विशेष म्हणजे, काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून असे प्रकार घडवून आणले जातात.

चांगल्या योजनेत मिठाचा खडा एक रुपयात पीक विमा काढला जातो. यामुळे शेतकऱ्यांना पूर्वीसारखे अधिकचे पैसे खर्च करण्याची गरज नाही. ही योजना फायदेशीर असतानाही गैरफायदा घेतला जात असल्याचे दिसून येते.

महत्त्वपूर्ण प्रस्ताव; मंजुरीची प्रतीक्षा कृषी आयुक्तालयाने शासनाकडे पीक विमा योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण प्रस्ताव पाठवलेला आहे. सदर प्रस्ताव मंजूर झाल्यास बनावटबाजीला लगाम बसेल.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाGadchiroliगडचिरोली