शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

By admin | Updated: July 7, 2015 01:26 IST

चिंतलपेठ येथील नयन दुर्गे याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल...

पालकमंत्र्यांनी दिले निर्देश : संतोष आत्राम यांनी केली होती मागणीअहेरी : चिंतलपेठ येथील नयन दुर्गे याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी यूथ काँग्रेसचे अहेरी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष संतोष आत्राम यांनी ५ जुलै रोजी अहेरी येथे आयोजित जनता दरबारात पालकमंत्र्यांकडे केली. दरम्यान पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करून या प्रकरणाच्या पुढील चौकशीचे आदेश उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावेळी दिले. निर्मल भारत स्वच्छता अभियानाअंतर्गत अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ या गावात शौचालय बांधकामासाठी खड्डे खोदण्यात आले. दरम्यान २२ जून रोजी पाण्याने भरलेल्या शौचालयाच्या खड्ड्यात पडून नयन दुर्गे या चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. यासाठी अहेरी पं. स. चे विस्तार अधिकारी पी. आर. रायपुरे व ग्राम पंचायतीच्या सचिव संध्या गेडाम हे जबाबदार आहेत, असा आरोप संतोष आत्राम यांनी पालकंत्र्यांसमोर जनता दरबारात केला. त्यामुळे या दोघांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आत्राम यांनी पालकमंत्री आत्राम यांच्याकडे केली.यावेळी पालकंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी या दोनही दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, तसेच नयन दुर्गे मृत्यू प्रकरणाची पुढील चौकशी गतीने करावी, असे निर्देश उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावेळी दिले. नयन दुर्गे मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच दोषी असलेल्या पी. आर. रायपुरे व संध्या गेडाम यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा न नोंदविल्यास ८ जुलैपासून अहेरीच्या एसडीओ कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संतोष आत्राम यांनी जनता दरबारात दिला. (तालुका प्रतिनिधी)