शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

सहा दारू तस्करांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:00 IST

अमिर्झा-धुंडेशिवणी मार्गावर गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून वाहनांची झडती घेतली. दरम्यान एमएच ३३-४६८४ या क्रमांकाच्या दुचाकीला अडवून तपासणी केली असता ३० लीटर मोहफुलाची दारू आढळून आली. त्यानंतर याच मार्गाने येणाऱ्या एमएच ३३ बी ३०६५ या क्रमांकाच्या दुचाकीतून ३० लीटर व सीजी ५२०२ या क्रमांकाच्या वाहनातून ३० लीटर अशी एकूण १८ हजारांची ९० लीटर दारूसह तीन दुचाकी वाहने जप्त करण्यात आले आहेत. या

ठळक मुद्देमोहफूल दारूसाठा पकडला : अमिर्झा-धुंडेशिवणी मार्गावर गडचिरोली पोलिसांचा सापळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुक्तिपथ कार्यकर्ते व गडचिरोली पोलिसांनी सोमवारी अमिर्झा-धुंडेशिवणी मार्गावर सापळा रचून सहा तस्करांकडून ९० लीटर हातभट्टी दारूसह मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपींवर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मनोज मुरलीधर भोयर, बंडू पांडुरंग म्हशाखेत्री दोघेही रा. अडपल्ली, गजानन पत्रू कोहपरे, विजय पत्रू कोहपरे, उत्तम राजाराम दास, अन्नाजी पत्रू कुळमेथे सर्व रा. दिभना असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.दारूची तस्करी होत असल्याची माहिती मुक्तीपथ अभियानाच्या चमूने गडचिरोली पोलिसांना दिली. त्यानुसार अमिर्झा-धुंडेशिवणी मार्गावर गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून वाहनांची झडती घेतली. दरम्यान एमएच ३३-४६८४ या क्रमांकाच्या दुचाकीला अडवून तपासणी केली असता ३० लीटर मोहफुलाची दारू आढळून आली. त्यानंतर याच मार्गाने येणाऱ्या एमएच ३३ बी ३०६५ या क्रमांकाच्या दुचाकीतून ३० लीटर व सीजी ५२०२ या क्रमांकाच्या वाहनातून ३० लीटर अशी एकूण १८ हजारांची ९० लीटर दारूसह तीन दुचाकी वाहने जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी सहाही आरोपींविरोधात गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण, सहायक फौजदार भास्कर ठाकरे, बीट अमलदार प्रमोद वाळके यांनी केली.कोरोना विषाणूचे वाढते प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. जिल्ह्यात दारूबंदी लागू असून सुद्धा झटपट पैसे कमविण्याच्या नादात अनेकजण छुप्या मार्गाने अवैध दारूचा व्यवसाय करीत आहे.या विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन देखील युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. मात्र, काही विक्रेते नवनवीन शकल लढवित जिल्ह्यात दारूचा पुर निर्माण करीत अनेक कुटुंब उध्वस्त करीत आहेत. त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात मुक्तिपथ अभियान कार्यरत असून प्रशासनाच्या मदतीने जिल्ह्यातून दारू हद्दपार करण्यासाठी प्रयत्नरत आहे. इतर ठिकाणावरून आणून गावात दारूची विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवरण्यास पोलीस प्रशासनाला मुक्तिपथ अभियानाने सहकार्य केले आहे.घरपोच मिळतो सुगंधित तंबाखूचा खर्राकोरोना लॉकडाऊनच्या काळात गडचिरोली शहरातील पानठेले बंद असले तरी अनेकांनी घरीच खर्रा घोटायचा व्यवसाय सुरू केला आहे. शिवाय बरेच जण पायदळ फिरून, काहीजण सायकल व दुचाकीने फिरून छुप्या पद्धतीने खºर्याची विक्री करीत आहेत. इंदिरा गांधी चौकातही हा खर्रा शौकिनांना उपलब्ध होत आहे. एकूणच शहरातील दारू व खर्रा विक्रीवर १०० टक्के निर्बंध आणण्याचे प्रशासन व मुक्तिपथसमोर मोठे आव्हान आहे.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी