लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेचे नगरसेवक प्रमोद पिपरे यांना दोन लाख रूपयांची खंडणी मागणाºया आरोपीस गडचिरोली पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ५ वाजता इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात अटक केली आहे.मयूर रैकवार (३०) रा. चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मयूर रैकवार याची जाहिरात एजन्सी आहे. शौचालय बांधून त्याच्या वापराविषयची जनजागृती करण्याचे काम मयूर रैकवार याच्या एजन्सीला देण्यात आले होते. तेव्हापासून प्रमोद पिपरे यांच्यासोबत त्याची ओळख झाली. त्यानंतर रैकवार याने पिपरे यांना फोन करून तुमची ध्वनीफीत माझ्याकडे असून ती व्हायरल करून तुम्हाला बदनाम करीन, अशी धमकी देऊन दोन लाख रूपयांची मागणी करीत होता. याबाबतची तक्रार करण्यात आल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून रैकवार याला अटक केली.
खंडणी मागणाºया आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:58 IST
गडचिरोली नगर परिषदेचे नगरसेवक प्रमोद पिपरे यांना दोन लाख रूपयांची खंडणी मागणाºया आरोपीस गडचिरोली पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ५ वाजता इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात अटक केली आहे.
खंडणी मागणाºया आरोपीस अटक
ठळक मुद्देदोन लाखांची मागणी : प्रमोद पिपरे यांना धमकी