शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

आमदार होळी यांच्या वाहनाला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2022 22:58 IST

डॉ. होळी आपल्या वाहनाने (एम.एच. ३३, एए ७९९९) दसऱ्याच्या दिवशी गडचिरोलीवरून आरमोरीकडे येत होते. गाढवी नदीच्या अरूंद पुलावरून ट्रकला ओव्हरटेक करत असतानाच विरुद्ध दिशेने दुचाकीस्वार येत होता. त्यामुळे त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या वाहनाची ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकलाच धडक बसली. यात दुचाकीस्वार प्रणय सुधाकर मडावी (रा. रायपूर, ता. चामोर्शी) हा ट्रकच्या खाली शिरला गेला. 

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी हे आपल्या खासगी वाहनाने गडचिरोलीवरून आरमोरीकडे येत असताना ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्या ट्रकला धडक बसली. यावेळी विरूद्ध दिशेने येणारे दुचाकी वाहन अनियंत्रित होऊन दोन्ही वाहनांची त्याला धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर ब्रह्मपुरी येथे उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी झाला.   प्राप्त माहितीनुसार, डॉ. होळी आपल्या वाहनाने (एम.एच. ३३, एए ७९९९) दसऱ्याच्या दिवशी गडचिरोलीवरून आरमोरीकडे येत होते. गाढवी नदीच्या अरूंद पुलावरून ट्रकला ओव्हरटेक करत असतानाच विरुद्ध दिशेने दुचाकीस्वार येत होता. त्यामुळे त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या वाहनाची ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकलाच धडक बसली. यात दुचाकीस्वार प्रणय सुधाकर मडावी (रा. रायपूर, ता. चामोर्शी) हा ट्रकच्या खाली शिरला गेला. 

बाईक पडली नदीपात्रात-    गाढवी नदीच्या अरुंद पुलावर तिसरे वाहन जात नसल्याचे समजताच दुचाकीस्वाराचे संतुलन बिघडले. त्यामुळे त्याने आपली बाईक ट्रकच्या बाजूने वळविली. त्यामुळे ट्रक व कारची बाईकला धडक बसून ती बाईक नदीपात्रात कोसळली. -    पण बाईकवरील प्रणय मडावी हा बाईकवरून उसळून ट्रकच्या दोन्ही चाकांच्या मध्ये शिरला. त्याला तत्काळ आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. त्यानंतर त्याला ब्रह्मपुरीला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. अधिक तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.

 

टॅग्स :AccidentअपघातDevrao Holiदेवराव होळी