आॅनलाईन लोकमतगडचिरोली : १० आॅक्टोबर २०१७ पासून कामबंद आंदोलन राज्यभर करण्यात आले. या आंदोलनादरम्यान मुंबई येथे मंत्रालयात १३ आॅक्टोबरला शासनाने बैठक घेऊन राज्य कार्यकारिणी व १४ जिल्ह्यांच्या जिल्ह्याध्यक्षांशी चर्चा करून मागण्या तत्त्वत: मान्य करण्यात आल्या. परंतु अद्यापही शासन निर्णय किंवा परिपत्रक निर्गमित झाले नाही. आंदोलन काळात मान्य केलेल्या मागण्या लागू कराव्या, अशी मागणी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे शनिवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.महसूल मंत्री जिल्हा दौºयावर आले असताना त्यांना निवेदन देण्यात आले. पुरवठा विभागातील सरळसेवा भरती बंद करणे, सुधारित आकृती बंधास मान्यता देणे, शिपाई संवर्गातील कर्मचाºयांना तलाठी संवर्गात आरक्षण देणे यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, सरचिटणीस विजय करपते, कार्याध्यक्ष येरमे उपस्थित होते.
आंदोलनातील मागण्या मान्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:29 IST
१० आॅक्टोबर २०१७ पासून कामबंद आंदोलन राज्यभर करण्यात आले.
आंदोलनातील मागण्या मान्य करा
ठळक मुद्देमहसूल मंत्र्यांना निवेदन : महसूल कर्मचारी संघटनेची मागणी