शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दंडाची रक्कम कमी करण्यासाठी स्वीकारले २० हजार; लाचखोर अभियंत्याला 'एसीबी'चा 'झटका'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 12:06 IST

आलापल्ली येथे रंगेहाथ पकडले

अहेरी/आलापल्ली : घरगुती विद्युत मीटरमध्ये छेडछाड केल्याने दोन लाख २० हजार रुपयांचा दंड केला, त्यानंतर दंडाची रक्कम कमी करून मीटर बदलवून देण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी करून पहिल्या टप्प्यात २० हजार रुपये स्वीकारणाऱ्या महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून जोराचा झटका दिला. ही कारवाई १७ ऑक्टोबरला आलापल्ली (ता. अहेरी) येथे करण्यात आली.

विनोदकुमार नामदेव भोयर (४७), असे त्या उपकार्यकारी अभियंत्याचे (वर्ग २) नाव आहे. तो राज्य विद्युत महावितरण कंपनी मर्यादित, आलापल्ली येथे कार्यरत आहे. एका ग्राहकाच्या घरगुती विद्युत मीटरमध्ये छेडछाड केल्याचे कारण देत भोयर याने दोन लाख २० हजार रुपयांचा दंड केला. ग्राहकाने दंडाची रक्कम कमी करण्याची विनंती केली. त्यानंतर दंडाची रक्कम कमी करून ७३ हजार ६९८ रुपये केली. दंडाची रक्कम कमी केल्याचा मोबदला म्हणून भोयर याने ४० हजार रुपये लाचेची मागणी केली.

दरम्यान, तक्रारदाराने गडचिरोली येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड यांनी तक्रारीची पडताळणी केली. त्यात तथ्य आढळल्यानंतर १७ ऑक्टोबरला सापळा लावला. महावितरण कार्यालयात लाचेची पहिल्या टप्प्यातील २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता भोयरला झडप घालून पकडले.

त्याच्याविरुद्ध अहेरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, शिवाजी राठोड, सहायक उपनिरीक्षक सुनील पेददीवार, हवालदार नथ्थू धोटे, राजेश पदमगीरवार, पो.ना. विक्रमजित सरकार, शिपाई किशोर ठाकूर, संदीप उडाण यांनी कारवाई केली.

वरोरा येथील निवासस्थानी झडती

दरम्यान, आलापल्ली येथे लाच स्वीकारताना पकडल्यावर उपकार्यकारी अभियंता विनोद भोयर याच्या कार्यालयासह निवासस्थानीही झाडाझडती करण्यात आली. वरोरा (जि. चंद्रपूर) येथील मूळ निवासस्थानी चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने तपासणी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणGadchiroliगडचिरोली