शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अबब ! कोरचीचे तहसीलदार बेघर! हक्काचे शासकीय निवासस्थानच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 05:00 IST

कोरचीच्या तहसीलदारांनी काही वर्ष याच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निवासस्थानात वास्तव्य केले आहे. पण सध्या कोरचीतील तहसीलदार व नायब तहसीलदारांना राहण्यासाठी शासकीय निवासस्थानच नाही. वास्तविक या अधिकाऱ्यांना शासनाच्या वतीने हक्काचे शासकीय निवासस्थान दिले जाते. मात्र कोरचीतील अधिकाऱ्यांना त्या बाबतीत असुविधेचा सामना करावा लागत आहे.

लिकेश अंबादेलाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : संपूर्ण तालुक्याचे प्रशासन सांभाळणाऱ्या तहसीलदारांना शासकीय निवासस्थान नसल्यामुळे चक्क खासगी घरात किरायाने राहावे लागत आहे. तहसीलदारांवर ही वेळ का आली, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागने अधिकाऱ्यांसाठी बांधलेल्या शासकीय क्वॉर्टरमधील अर्धा भाग आदिवासी विकास महामंडळाला भाड्याने दिला आहे. उर्वरित अर्ध्या भागात नायब तहसीलदार राहात आहेत.कोरचीच्या तहसीलदारांनी काही वर्ष याच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निवासस्थानात वास्तव्य केले आहे. पण सध्या कोरचीतील तहसीलदार व नायब तहसीलदारांना राहण्यासाठी शासकीय निवासस्थानच नाही. वास्तविक या अधिकाऱ्यांना शासनाच्या वतीने हक्काचे शासकीय निवासस्थान दिले जाते. मात्र कोरचीतील अधिकाऱ्यांना त्या बाबतीत असुविधेचा सामना करावा लागत आहे.

तालुका निर्मितीला २८ वर्ष पूर्ण, तरीही समस्या सुटता सुटेना

- कोरची तालुका निर्मितीला २८ वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र आतापर्यंत  तहसीलदार व नायब तहसीलदारांकरिता शासकीय निवासस्थान नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांना कोरची शहरातील लोकांच्या घरी भाड्याने राहून कर्तव्यावर जावे लागत आहे. 

- काही वर्षांपूर्वी कोरची शहरात भाड्याने राहायला घरसुद्धा मिळत नव्हते. त्यामुळे तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेले एक स्लॅबचे निवासस्थान रिकामे होते. तत्कालीन तहसीलदारांनी काही वर्षे त्यात वास्तव्य केले. त्यांची बदली झाल्यानंतर नव्याने रुजू झालेले तहसीलदार व नायब तहसीलदारांना ते निवासस्थान राहण्यायोग्य दिसले नाही. त्यामुळे त्यांनी खासगी व्यक्तीच्या घरी भाड्याने राहणे पसंत केले. 

निवाासस्थानाअभावी मुख्यालयाला खोमहसूल विभागात कार्यरत असलेल्या १६ कर्मचाऱ्यांसाठी मंजूर असलेले निवासस्थानही खूप जुने आहे. तालुका अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त असल्याने पोलीस ठाण्याची निर्मिती झाली आहे. त्याच ठिकाणी पोलीस विभागातील कर्मचारी राहात आहेत. पण महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय नसल्यामुळे अनेक कर्मचारी कोरचीत भाड्याने रूम करून राहात आहेत. काही कुरखेडा-वडसा-आरमोरी-ब्रह्मपुरीवरून अपडाऊन करतात. निवसाची सोयच नाही तर मुख्यालयी मुक्कामी राहायचे कसे? असाही सवाल काही कर्मचारी करतात.

कोरचीत असलेले शासकीय निवासस्थान हे तहसीलदारांचे नसून सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. दुसरे निवासस्थान नसल्यामुळे आधीचे तहसीलदार काही दिवस त्या ठिकानी राहिले असतील. तहसीलदार व नायब तहसीलदार यांना राहण्यासाठी शासकीय निवासस्थानच नाही. त्यामुळे आतापर्यंत तहसीलदार व नायब तहसीलदार आपल्या सोईनुसार मुख्यालयी राहतात.- छगनलाल भंडारी, तहसीलदार, कोरची

 

टॅग्स :Tahasildarतहसीलदारpwdसार्वजनिक बांधकाम विभाग