शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मोह टोळ वेचणीसाठी गेलेल्या महिलेचा वाघाने घेतला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:45 IST

Gadchiroli : दबा धरून बसलेल्या वाघाने घातली झडप, पोर्ला वनपरिक्षेत्रातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवडधा (जि. गडचिरोली) : मोह टोळाच्या वेचणीकरता जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने ठार केले. ही हृदयद्रावक घटना पोर्ला वनपरिक्षेत्राच्या देलोडा (ता. आरमोरी) जंगलात ५ जून रोजी सकाळी १० वाजता घडली. मीरा आत्माराम कोवे (५५, रा. सुवर्णनगर, देलोडा) असे मृत महिलेचे नाव आहे.

मीरा कोवे या सकाळी १० वाजताच्या सुमारास जेवण करून गावाला लागून असलेल्या जंगलातील कक्ष क्र. (१०) मध्ये टोळी वेचण्यासाठी गेल्या होत्या. टोळी वेचण्यात त्या मग्न असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. पोर्ला ते वडधा मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना वाघाचे दर्शन झाले तेव्हा बराचवेळ उलटूनसुद्धा महिला घरी परत आली नाही म्हणून कुटुंबाला संशय आला. जंगल परिसरात दुपारी ४ वाजताच्या सुमारास शोधाशोध सुरू केली असता, मीरा कोवे यांचा मृतदेह आढळला. वन विभागाने पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पती, दोन मुलांच्या मृत्यूनंतर एकट्याच ओढत होत्या संसारमीरा कोवे यांच्या पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले होते. तर चार वर्षांपूर्वी मोठ्या मुलाचा आजारपणात मृत्यू झाला, तर दोन वर्षापूर्वी धाकट्या अविवाहित मुलानेही आजारपणात प्राण सोडले. मीरा कोवे या सून व दोन लहान नाती यांच्यासह राहात होत्या. जेमतेम दीड एकर शेतीवर त्यांची गुजराण होती. त्यामुळे पती, दोन मुलांच्या जाण्याचे दुःख पचवत त्या मोलमजुरी व हंगामात मोहफुले, मोह टोळी वेचणी करून कुटुंबाचा गाडा हाकत.

चालू वर्षातील दुसरी घटना

  • चालूवर्षी चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै.) येथे मार्च २०२५ मध्ये वाघाने एका पुरुषाचा बळी घेतला होता.
  • देलोडा जंगलात मीरा कोवे यांनाही वाघाच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले. चालू वर्षातील व्याघ्रबळीची ही दुसरी घटना आहे.
टॅग्स :GadchiroliगडचिरोलीTigerवाघ