शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
3
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
4
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
5
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
6
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
7
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
8
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
9
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
10
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
11
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
12
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
13
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
14
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
15
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
16
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
17
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
18
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
19
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट

शेताकडे जाणाऱ्या महिलेला वाघाने केले ठार, हिरापूरच्या शेतशिवारातील घटना

By गेापाल लाजुरकर | Updated: November 24, 2023 21:53 IST

इंदिराबाई खेडेकर या आपल्या शेतातील धानाच्या लाेंबी (सरवा) वेचण्यासाठी पाथरगाेटा भागातील शेतात हिरापूर-शिवणी मार्गाने जात हाेत्या.

 

गडचिरोली : धान बांधणीनंतर शेतातील शिल्लक लाेंबी वेचण्यासाठी जाणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. ही घटना शुक्रवार २४ नाेव्हेंबर राेजी दुपारच्या सुमारास हिरापूर येथील कंपार्टमेंट नं. १६६ मधील शेतशिवारात घडली. इंदिराबाई उमाजी खेडेकर (५५) रा. हिरापूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.इंदिराबाई खेडेकर या आपल्या शेतातील धानाच्या लाेंबी (सरवा) वेचण्यासाठी पाथरगाेटा भागातील शेतात हिरापूर-शिवणी मार्गाने जात हाेत्या. परंतु याच वेळी रस्त्यालगतच्या झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने इंदिराबाईवर हल्ला करून त्यांना झुडपात फरफटत नेले. सायंकाळ हाेऊनही इंदिराबाई घरी परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा शाेध घेण्यासाठी कुटुंबीयांनी शेताच्या दिशेने धाव घेतली व शाेध सुरू केला. तेव्हा सायंकाळी सात वाजताच्या सुमारास इंदिराबाई यांचा मृतदेह पाथरगोट्याजवळ आढळला. त्यानंतर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व इंदिराबाईंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यांच्या पश्चात पती, दाेन मुले, सुना, नातवंड आहेत.धाेका पत्करून शेतीची कामेहिरापूर परिसरात चार ते पाच वाघांचा वावर आहे. याच भागात अनेकांची शेती आहे. सध्या धान कापणी, बांधणी व मळणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाघाच्या दहशतीत धाेका पत्करून शेतीची कामे करावी लागत आहेत.

 

टॅग्स :TigerवाघWomenमहिलाFarmerशेतकरीforest departmentवनविभाग