शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जावई व मुलाशी भांडणाचा वचपा काढला पत्नीवर; कुऱ्हाडीने घाव घालून केली हत्या

By गेापाल लाजुरकर | Updated: July 2, 2023 18:41 IST

जून महिन्यात जावई व मुलाने मारझाेड केली. ते

गडचिराेली : जून महिन्यात जावई व मुलाने मारझाेड केली. तेव्हापासून पत्नी मुलीकडे राहायला गेली. हा राग मनात धरून पतीने जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या पत्नीच्या डाेक्यावर कुऱ्हाडीने घाव घालून तिची हत्या केली तर प्रतिकार करणाऱ्या मुलीलासुद्धा गंभीर जखमी केले, ही घटना काेरची तालुक्यातील काेचीनारा येथे रविवार २ जुलै राेजी सकाळी ११:३० वाजता घडली. रेखाबाई प्रीतराम धकाते (४५) असे मृत महिलेचे तर श्यामबाई संजय देवांगण (२७) रा. काेचीनारा असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे.

रेखाबाई व श्यामबाई ह्या दाेघीही शेजारील आशा भक्ता व संगीता बघवा यांच्यासोबत रविवारी सकाळी सरपण गोळा करण्यासाठी गावालतच्या जंगलात गेल्या होत्या. तेव्हा आरोपी पती प्रीतराम धकाते (४८) हा त्यांच्यावर पाळत ठेवून हाेता. हीच संधी साधून प्रीतरामने रेखाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घातले. यावेळी मुलगी श्यामबाई ही प्रतिकार करण्यासाठी गेली. तेव्हा तिच्या डाव्या हातावर व कमरेवर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. तसेच पत्नीवर घाव घालणे सुरूच ठेवले. याचवेळी जखमी मुलीने पती संजय देवांगण व भाऊ महेशला फोन करून घटनेबाबत माहिती दिली. 

ते येतपर्यंत आरोपी पती प्रीतराम घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेन पसार झाला. यानंतर जखमींना दुचाकीने कोरची ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले; परंतु रेखाबाई हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मुलगी श्यामबाई देवांगण हिला गंभीर अवस्थेत गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले. ह्या घटनेबाबत कोरची पोलिस स्टेशनमध्ये आरोपी प्रीतराम विरोधात कलम ३०२, ३२६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास सहायक पाेलिस निरीक्षक गणेश फुलकवर करीत आहेत.

पत्नी साेबत राहत नसल्याची खुन्नसजून महिन्यात जावई संजय देवांगण व मुलगा महेश धकाते यांचे आरोपी प्रीतरामशी घरी भांडण झाले होते. यावेळी प्रीतरामला जावई व मुलाने मारझोड केली होती. तेव्हा प्रीतराम हा जखमी जखमी हाेऊन त्याने ब्रह्मपुरी येथील खासगी दवाखान्यात उपचार घेतला हाेता. प्रीतरामने सदर घटनेची तक्रार कोरची पोलिस स्टेशनमध्ये केली होती. तेव्हापासून पत्नी रेखाबाई धकाते गावातीलच जावयाकडे निवासी राहत होती. ती सोबत राहत नसल्याचा राग मनात धरून प्रीतरामने कुऱ्हाडीने पत्नीची हत्या केली. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू