शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

प्लॉट खरेदीदारांना लुटणारी टोळी आली ; नागरिकांची प्लॉट दाखवून फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 14:45 IST

सावधान : प्लॉट एकाचा, दाखवतो भलताच; इसारच्या नावावर उकळतात लाखो रुपये

दिगांबर जवादे लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शहरातील कुणाचाही प्लॉट दाखवून त्याचा अगदी स्वस्तात सौदा करून टोकन म्हणून दोन ते तीन लाख रूपये उकळणारी टोळी गडचिरोली शहरात सक्रीय झाली आहे. या टोळीपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. काही नागरिकांची अशा पद्धतीने फसवणूक झाली आहे.

जिल्हास्थळ असलेल्या गडचिरोली शहराची लोकसंख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. शहराच्या एका बाजूला कठाणी नदी, दोन्ही बाजूला जंगल असल्याने विस्तारासाठी फारशी जागा शिल्लक नाही. त्यामुळे खरेदीदारांच्या तुलनेत प्लॉटची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. एखाद्या जागेवर चुना टाकून आखणी झाल्याच्या काही दिवसातच प्लॉट विकले जातात. शहराच्या मध्यभागी असलेली जागा व्यावसायिक कामासाठी खरेदी केली जाते. या प्लॉटचे दर तर अधिक आहेत. काही जाणांनी अनेक वर्षांपूर्वी गुंतवणूक म्हणून सदर प्लॉट खरेदी केले आहेत. काही प्लॉटधारक दुसऱ्या शहरात राहतात. याचा गैरफायदा काही लोकांनी घेण्यास सुरुवात केली आहे. एखादा प्लॉट दाखवून तो विकायचा आहे, असे सांगीतले जाते. एखाद्याला बनावट प्लॉटमालक बनवून सौदा केला जातो. दरम्यान, आतापर्यंत पोलिसांत तक्रार आलेली नाही. मात्र, अनोळखींशी व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. 

'प्राईम लोकेशन'वरील प्लॉट दाखवून सौदा काही नागरिकांनी केवळ गुंतवणूक म्हणून प्लॉट खरेदी करून ठेवले आहेत. आता या प्लॉटच्या चारही बाजूला वस्ती झाली आहे. त्यामुळे एखादाच प्लॉट शिल्लक आहे. बरेचसे प्लॉट मालक गडचिरोलीत राहत नाही. त्यामुळे एजंटने जरी प्लॉट दाखवला तरी कोणाचाही आक्षेप राहत नाही.

स्वस्तात मस्तला बळी पडतात ग्राहक प्लॉटधारकाला अडचण आहे, असे भासवले जाते. सदर प्लॉट चार ते पाच जण खरेदी करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे इसार म्हणून काही पैसे लवकर द्यायला सांगितले जाते. प्लॉट स्वस्तात मिळत असल्याच्या आमिशाला खेरेदीदार बळी पडतात. इसार म्हणून एक ते दोन लाख रूपये देतात. पैसे देणारा जेव्हा प्लॉटच्या कागदपत्रांची मागणी करतो. तेव्हा आपण फसवल्या गेलो असल्याचे दिसून येते.

अनेकांचे व्यवहार फसले, काळजी घ्या 

  • अशा प्रकरणांमध्ये काही लोकांची फसवणूक झाली आहे. मात्र अजूनपर्यंत पोलिस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली नाही. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींसोबत व्यवहार करून नये. 
  • इसार देण्यापूर्वी प्लॉटच्या कागदपत्रांची पडताळणी करणे हिताचे आहे. प्लॉट खरेदी विक्रीतून फसवणुकीचा आठ महिन्यांपूर्वी एक गुन्हा नोंद झालेला आहे. याची व्याप्ती कोट्यवधींच्या घरात होती.
टॅग्स :fraudधोकेबाजीGadchiroliगडचिरोली