शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

टीसी काढण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोन आरोपींना अटक

By दिगांबर जवादे | Updated: June 12, 2023 16:21 IST

चक्कर आली असल्याने तिची शक्ती क्षीण झाली होती. याचा गैरफायदा नराधमांनी घेतला.

गडचिरोली : दहावी उत्तीर्ण झाल्याने शाळेतून टीसी काढण्यासाठी आलापल्ली येथे आलेल्या एटापल्ली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर दोन युवकांनी अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी दोन्ही युवकांना अटक केली आहे.

नेहाल श्यामसुंदर कुंभारे (२४, रा. जीवनगट्टा, ता. एटापल्ली) व रोशन विठ्ठल गोडसेलवार (२२, रा. आलापल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी युवकांची नावे आहेत. पीडित मुलगी ही एटापल्ली तालुक्यातील आहे. ती आलापल्ली येथील एका शाळेत शिकत होती. दहावी उत्तीर्ण झाल्याने टीसी काढण्यासाठी १० जून रोजी आलापल्ली येथील शाळेत गेली. टीसी मिळण्यास उशीर लागेल, असे शिक्षकाने सांगितले. त्यामुळे गावाकडे जाण्यास निघाली तेव्हा नेहाल कुंभारे हा दुचाकीने जाताना दिसला. तो ओळखीचा असल्याने पीडित मुलीने त्याला फोन करून बोलाविले. उन्हामुळे चक्कर आल्यासारखे वाटत असल्याने गावाकडे नेऊन दे, अशी विनंती मुलीने नेहालला केली. त्याने आलापल्ली येथील रोशन गोडसेलवार याच्या घरी नेले. 

त्या ठिकाणी पाण्याच्या नावावर तिला काही तरी वेगळेच पिण्यास दिले. पाण्याचा वेगळाच वास येत होता, मात्र चक्कर येत असल्याने मुलीने ते पिऊन घेतले. काही वेळातच तिला चक्कर आली व ती बेडवर झोपली असताना रोशन व नेहालने आळीपाळीने अत्याचार केला. पीडित मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चक्कर आली असल्याने तिची शक्ती क्षीण झाली होती. याचा गैरफायदा नराधमांनी घेतला. शुद्धीवर आल्यावर तिला हा प्रकार लक्षात आला. सायंकाळी ती दुसऱ्या मित्राच्या दुचाकीवर गावी पोहोचली. तिने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. ११ जून रोजी एटापल्ली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मात्र, घटना अहेरी पोलिस स्टेशनअंतर्गत येत असल्याने सदर प्रकरण एटापल्ली पोलिसांनी अहेरी पोलिसांकडे वर्ग केले. अहेरी पोलिसांनी नेहाल व रोशन या दोघांनाही १२ जून रोजी अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणGadchiroliगडचिरोली