शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वेडसर पतीने केली पत्नीची धारदार सुरीने वार करून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2022 23:38 IST

सोमवारी अजय बाहेरगावी गेला होता. वडील वेडसरपणे वागत असल्याने त्याने आपल्या आईला सायंकाळी झोपण्यासाठी मामाच्या घरी जाण्यासाठी सांगितले होते. मामाचे घर त्याच गावी असल्याने तो निश्चिंत होता. परंतु त्याच्या माघारी त्याच्या वडिलाने आपला नेम साधून ही हत्या केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कधानोरा : घरी कोणी नसताना वेडसर पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यावर सुरीने वार करून तिची हत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.४) सकाळी तालुक्यातील कोवानटोला (जपतलाई) येथे घडली. आरोपी पतीला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.  प्राप्त माहितीनुसार, पोलीस मदत केंद्र येरकड जवळील कोवानटोला (जपतलाई) या गावातील मीराबाई परसराम कुमरे (४५ वर्ष) ही महिला व तिचे पती परसराम धनू कुमरे (४८ वर्ष) हे मुलगा अजय (२३) याच्यासोबत राहात होते. सोमवारी अजय बाहेरगावी गेला होता. वडील वेडसरपणे वागत असल्याने त्याने आपल्या आईला सायंकाळी झोपण्यासाठी मामाच्या घरी जाण्यासाठी सांगितले होते. मामाचे घर त्याच गावी असल्याने तो निश्चिंत होता. परंतु त्याच्या माघारी त्याच्या वडिलाने आपला नेम साधून ही हत्या केली.

हातपाय बांधून केले पोलिसांच्या स्वाधीन -    धनू कुमरे याने पत्नीची हत्या केल्याचे कळताच गावकऱ्यांनी त्याचे हातपाय बांधले आणि पोलीस पाटील व सरपंचांनी पोलीस मदत केंद्र येरकड येथे संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर समस्त गावकऱ्यांनी धानोरा पोलीस स्टेशनला आणून आरोपीला त्यांच्या स्वाधीन केले. -    मृत महिलेचा मृतदेह शवपरीक्षणासाठी धानोरा येथे आणण्यात आला. आरोपी धनू कुमरे याला अटक केली असून अधिक तपास धानोरा पोलीस  करीत आहेत.

भाचा घरी आला अन् हत्येचा उलगडा झालामंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास मृत मीराबाईचा भाचा सुनील पोटावी हा आत्याच्या घराकडे जाण्यासाठी निघाला असता मामा धनू कुमरे हा दारासमोर कुऱ्हाड घेऊन बसून होता. त्यामुळे सुनील याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने घरात जाण्याचा प्रयत्न केला असता मामा त्याच्यावरच कुऱ्हाड घेऊन धावून आला. त्यामुळे काहीतरी काळेबेरे नक्की आहे अशी त्याला खात्री झाली. त्यामुळे त्याने गावातील पोलीस पाटील, सरपंच यांना व गावकऱ्यांना सूचना देऊन आत्याच्या घराकडे धाव घेतली. धनू कुमरे याला विश्वासात घेऊन विचारले असता त्याने सर्व हकीकत सांगितली. मी पत्नीच्या डोक्यावर सुरीने वार केला व त्यात तिचा मृत्यू झाला, असे त्याने सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी