शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिका न मिळाल्याने बसमधून दवाखान्यात, पण प्रयत्न असफल, ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

By संजय तिपाले | Updated: June 27, 2024 15:40 IST

आरोग्यसेवेचे धिंडवडे: अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम पेरमिलीची घटना

गडचिरोली : अचानक प्रकृती खालावल्यानंतर वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना २४ जूनला अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम पेरमिली येथे घडली. तीन दिवसांनंतर समोर आलेल्या या घटनेने आरोग्य सेवेचे धिंडवडे उडाले आहेत.

 

आर्यन अंकित तलांडी (४, रा. कोरेली ता. अहेरी) असे मृत बालकाचे नाव आहे.  २३ जून रोजी मध्यरात्री त्याची प्रकृती खालावली होती. त्याला पोटदुखीचा त्रास होता. कोरेलीपासून पाच किमी दूर असलेल्या पेरमिली आरोग्य केंद्रात त्याला उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आर्यनवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर आर्यनला पालकांनी घरी कोरेलीला परत नेले. २४ जूनला पहाटे त्याला अधिक त्रास होऊ लागल्याने त्याला पुन्हा पेरमिली आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला अहेरी येथे नेण्यास सांगितले. परंतु वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पालक आर्यनला घेऊन बसने अहेरीसाठी निघाले. दरम्यान, वाटेत त्याची प्रकृती अधिक खालावली. ही बाब बस चालक गौरव आमले यांना लक्षात येताच त्यांनी बस थेट आलापल्ली येथील आरोग्य केंद्रात नेली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. यावेळी आर्यनसोबत त्याचे आजी व आजोबा होते. तर वडील दुचाकीने यायला निघाले होते. घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने पालकांनी रुग्णालय परिसरात टाहो फोडला होता. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांना संपर्क केला, पण कार्यक्रमात असल्याचे सांगून त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

 

रुग्णवाहिका नसताना रेफर केले कसे ?आर्यनवर २३ जूनच्या रात्रीपासून उपाचार सुरु करण्यात आले होते. शेवटच्या क्षणी प्रकृती अधिक खालावल्याने त्याला अहेरीला ‘रेफर’ करण्यात आले. उशीर न करता आधीच त्याला अहेरीला पाठविले असते आणि रुग्णावाहिका वेळेवर उपलब्ध झाली असती तर आर्यनचा जीव वाचला असता असा पालकांचा दावा आहे.  दरम्यान, रुग्णवाहिका नसताना चिमुकल्याला शेवटच्या क्षणी रेफर केले कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

 

कधी संपणार हा वनवास ?जिल्ह्यात उपचाराअभावी दोन मातांचा मृत्यू झाल्याची घटना अहेरी येथे तीन महिन्यांपूर्वी घडली होती. समिती नेमून चौकशी केली, पण कारवाई काहीच झाली नाही. यापूर्वी देखील दुर्गम, अतिदुर्गम आदिवासीबहुल भागात रुग्णांना  कधी झोळीतून तर कधी नाला पार करण्यासाठी डोंग्यातून प्रवास करत दवाखाना गाठावा लागल्याचे चित्र आहे. काही अधिकारी मुख्यालयी थांबत नाहीत, आदिवासींना पायाभूत आरोग्य सुविधा मिळत नसल्याची ओरड नेहमीच होते, त्यामुळे हा वनवास संपणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीhospitalहॉस्पिटल