लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील न्यायालयांमध्ये १४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत ९८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यातून सुमारे ६६ लाख ५६ हजार ३४२ रुपयांची वसुली करण्यात आली.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एस.सी. खटी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी. जी. कांबळे यांच्या देखरेखीखाली राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन जिल्हाभरातील न्यायालयांमध्ये करण्यात आले होते. गडचिरोली येथे जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा मुख्य न्यायदंडाधिकारी बी.एम. पाटील, सह दिवाणी न्यायाधीश (क स्तर) तथा प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एन. सी. बोरफळकर यांनी पॅनल सांभाळले.यासाठी अॅड. पी. पी. भोयर, अॅड. एस. एस. भट, अॅड. प्रणाली वासनिक, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. टी. डी. बोरावार, ज्येष्ठ अधिव्याख्याता अॅड. लिलाधर डेकाटे, अॅड. पी. बी. ब्राह्मणवाडे, अॅड. सिध्दीकी मन्सुरी, अॅड. पल्लवी केदार, अॅड. उमाजी देशमुख, अॅड. कांचन म्हशाखेत्री, अॅड. निलीमा जुमनाके, सामाजिक कार्यकर्ते एस. टी. बिटुरवार, अखिल अहमद, मोहम्मद शफी शेख, वर्षा मनवर यांच्यासह जिल्हा वकील संघ व न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीने प्रकरणे निकाली काढले जात असल्याने दोन्ही बाजूकडील नागरिकांचा वेळ, पैसा व श्रम वाचण्यास मदत होत असल्याने दिवसेंदिवस लोकअदालतीत ठेवल्या जाणाºया प्रकरणांची संख्या वाढत चालली आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीत ९८ प्रकरणे तडजोडीने निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:00 IST
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एस.सी. खटी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी. जी. कांबळे यांच्या देखरेखीखाली राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन जिल्हाभरातील न्यायालयांमध्ये करण्यात आले होते.
राष्ट्रीय लोकअदालतीत ९८ प्रकरणे तडजोडीने निकाली
ठळक मुद्दे६७ लाखांची वसुली । जिल्हाभरातील न्यायालयांमध्ये आयोजन