शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

९ लाख ७५ हजार ७०० रूपयांची दारू जप्त

By admin | Updated: May 17, 2016 01:05 IST

चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. व आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे १५ व १६ मे रोजी जिल्हा पोलीस

कुनघाडा व ठाणेगाव येथे कारवाई : विशेष पथकाने पकडला साठागडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. व आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे १५ व १६ मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष दारूबंदी पथकाने ९ लाख ७५ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे या परिसरातील दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. १५ मे रोजी ठाणेगाव येथील छत्रपती ताराचंद उपरीकर, प्रेमिला छत्रपती उपरीकर (३०) यांच्याकडे पथकाने धाड घातली. यात विदेशी दारूच्या २४ हजार रूपये किमतीच्या ९६ निपा, गोल्डन गोवा दारूच्या ३३ हजार ६०० रूपयांच्या ३३६ निपा, हार्वड कंपनीच्या २६ हजार रूपये किमतीच्या १३० निपा तसेच ९ हजार २०० रूपये किमतीच्या ८६ बॉटल व देशी दारूच्या १ लाख १० हजार रूपये किमतीच्या २ हजार २०० निपा, तसेच मोहफुलाची २६ हजार ५०० रूपयांची २६५ लिटर दारू असा २ लाख २७ हजार ७०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला. प्रेमिला छत्रपती उपरीकर हिला अटक करण्यात आली असून छत्रपती उपरीकर फरार असल्याची माहिती पथकाच्या प्रमुखांनी दिली आहे. या दोघांच्याही विरूध्द आरमोरी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर १६ मे रोजी सोमवारी कुनघाडा ते इरई गाव या दरम्यान पोलिसांनी विश्वजीत ऊर्फ राजू दास (३०) रा. धानोरा, सपन सतीश मंडल (४०), नीलेश मारोती टिकले (२८) रा. दोघेही कुनघाडा, दिलीप विकास बाला रा. धानोरा यांच्याकडून विदेशी दारूच्या १ लाख ८ हजार रूपये किमतीच्या ४३२ निपा, गोल्डन गोवा विस्कीच्या १ लाख ३४ हजार ६०० रूपये किमतीच्या १ हजार ३४६ निपा, दारू विक्रीतून रोख आलेले ५ हजार ४०० व दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेले ५ लाख रूपये किमतीचे सीजी १९/बीडी ६६१० क्रमांकाचे चारचाकी वाहन असा एकूण ७ लाख ४८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्व आरोपींविरोधात चामोर्शी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)