शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

९७ कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:31 IST

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा वर्धापन दिनाचे औचित्य साधून २५ आॅगस्ट रोजी मूल मार्गावरील राजस्व बचत भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देजिल्हा वर्धापन दिनाचे औचित्य : महसूल संघटना व जुनी पेन्शन हक्क संघटनेचा संयुक्त उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा वर्धापन दिनाचे औचित्य साधून २५ आॅगस्ट रोजी मूल मार्गावरील राजस्व बचत भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरादरम्यान सुमारे ९७ कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली.रक्तदान शिबिराचे उद्घाटन सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी निवडणूक उपजिल्हाधिकारी संपत खलाटे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, धानोराचे तहसीलदार महेंद्र गणवीर, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी विकास सावंत, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे आदी मान्यवर उपस्थित होते.गडचिरोली जिल्ह्यात वेळोवेळी रक्ताची टंचाई निर्माण होते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी धावपळ करावी लागते. कधीकधी रक्ताअभावी रुग्णाला जीवही गमवावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या रक्तदान शिबिरात सुमारे ९७ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.डॉ.अनिल रूडे यांनी मार्गदर्शन करताना रक्ताचे महत्त्व लक्षात घेऊन रक्तदानाची चळवळ बनणे आवश्यक आहे. प्रत्येक सक्षम व्यक्तीने रक्तदान केले पाहिजे. कार्यक्रमाला उपस्थित उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, तहसीलदार महेंद्र गणवीर, विकास सावंत, गुरूदेव नवघडे, चंदू प्रधान यांनी मार्गदर्शन केले. संचालन जुनी पेंशन हक्क संघटनेचे सरचिटणीस बापू मुनघाटे तर आभार महसूल कल्याण निधीचे सचिव सत्यनारायण अनमदवार यांनी सहकार्य केले. रक्तदान शिबिराला आ.डॉ.देवराव होळी यांनी भेट दिली.यशस्वीतेसाठी जुनी पेंशन हक्क संघटनेचे उपाध्यक्ष अंकुश मैलारे, वनश्री जाधव, गणेश आखाडे, प्रशांत ठेंगरी, अमरदीप रंगारी, दीपक सुरपाम, गजानन गेडाम, युवराज तांदळे, समीर भजे, तुळशिदास नरोटे, विजय मुडपल्लीवार, संजय राऊत, मुलचंद शिवणकर, नरेश रामटेके, अशोक तागडे, विकास दोडगे, मंगेश दडमल, संजय निकोसे, माजीद शेख, महसूल कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष वनीश्याम येरमे, अल्पेश बारापात्रे, अर्चना वडेट्टीवार, रोशनी दाते, सोनाली कंकडालवार, पियूष आखाडे, नितीन तर्वेकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.योजना राबविणाऱ्यांना अंशदायी पेन्शनधारकांचे दु:ख काय कळणाररक्तदान शिबिराच्या उद्घाटनपर कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.सचिन ओंबासे म्हणाले, गडचिरोली जिल्हा मागास असल्याने या जिल्ह्यात अनेक समस्या आहेत. अशा परिस्थितीत येथील कर्मचाºयांकडून रक्तदान शिबिरासारखे लोकोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे, असे मार्गदर्शन केले. अंशदायी पेंशन योजना कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत मारक आहे. नियमित पेंशनधारकांच्या तुलनेत केवळ ३० टक्के रक्कम अंशदायी पेंशनधारकांना मिळणार आहे. योजना राबविणारे वरिष्ठस्तरावर बसलेल्या अधिकाऱ्यांना सध्या पेंशन मिळत आहे. त्यामुळे अंशदायी पेंशनधारकांचे दु:ख काय ते कळणार नाही. जुने अधिकारी सेवानिवृत्त होऊन अंशदायी पेंशन असलेले अधिकारी मोठ्या हुद्यावर बसलेले असतील. त्यावेळी अंशदायी पेंशन योजनेचा विरोध तीव्र होईल व परिस्थिती बदलली असेल, असा आशावाद व्यक्त केला.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी