शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

९३ हजारांच्या दंडाची कारवाई

By admin | Updated: June 19, 2014 23:50 IST

चामोर्शी उपविभागातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. ९३ हजार रूपयांचा दंड मे महिन्यातील कारवाईतून करण्यात आला आहे.

चामोर्शी : चामोर्शी उपविभागातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. ९३ हजार रूपयांचा दंड मे महिन्यातील कारवाईतून करण्यात आला आहे. या दंडाची रक्कम वसूल करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती तहसीलदार एस.टी. खंडारे यांनी दिली आहे.चामोर्शी तालुक्यात महसूल उपविभागाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करण्यात येत होती. त्यानुसार सर्व मंडळ अधिकारी व तहसीलदार चामोर्शी यांनी गौण खनिज उत्खनन परवानाधारकांची तपासणी करून दंडात्मक कारवाई केली आहे. उपविभागीय अधिकारी देवेंंद्रसिंह यांच्या निर्देशानुसार महसूल प्रशासनाने तळोधी मोकासा येथील नीलकंठ मनोहर कुनघाडकर यांच्याकडे ५८ हजार विटा हे गौण खनिज सापडले. त्यांच्यावर २५ हजार रूपये दंडाची कारवाई मे महिन्यात करण्यात आली. तसेच सुनिल नीलकंठ चलाख तळोधी मोकासा यांच्याकडेही ५८ हजार विटा आढळल्या. त्यांच्यावरही २५ हजार रूपयाच्या दंडाची कारवाई करण्यात आली. तसेच चामोर्शी येथील पत्रू किसन सोरते यांच्याकडे ५७ हजार विटा आढळून आल्या. त्यांच्यावरही २५ हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तळोधी येथील अशोक विठोबा संतोषवार यांच्याकडे १८ हजार विटा हे गौण खनिज आढळून आले. त्यांच्यावर १८ हजार रूपयांचा दंड करण्यात आला आहे. लखमापूर बोरी येथील गुरूदेव चापले यांनी स्वत:च्या मालकीच्या ट्रॅक्टरने एकोडी येथील नदीघाटावर अवैध उत्खनन सुरू केले होते. ६ मे २०१४ ला सकाळी ५.३० वाजता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. गुरूदेव चापले हे अहोरात्र विनापरवाना अवैध उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवित होते. त्यानुसार त्यांच्यावर तहसीलदार चामोर्शी यांनी दंडात्मक कारवाई केली आहे.यासंदर्भात तहसीलदार एस. टी. खंडारे यांना विचारणा केली असता, ९० हजार रूपयाचा दंड आकारण्यात आला आहे. शेती हंगामात ट्रॅक्टर मालकाचे नुकसान होऊ नये म्हणून ट्रॅक्टर परत करण्यात आला. दंडात्मक कारवाईची वसुली अद्याप बाकी आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शासनाच्या स्वामीत्व धनाची अवैधरित्या साठवणूक अथवा वाहतूक याला आळा घालण्याकरिता चामोर्शी उपविभागात धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. अवैध गौण खनिजाची चोरी करण्यास मनाई करण्यात आली असून यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे व अशी मंडळी शासनाविरूद्ध लोकांमध्ये भ्रम पसरविण्याचे काम करीत आहे. यापुढेही अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरूच राहील. दंडात्मक तसेच फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी चामोर्शी यांनी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)