शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

१३ सरपंचांसह ८८ सदस्य अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:57 AM

गडचिरोली जिल्ह्यातील पाच तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवारी (दि.२६) मतदान झाले. यात नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिलशील असलेल्या २० पैकी १३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचासह ८८ सदस्य अविरोध निवडून आले.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : जिल्ह्यातील अभूतपूर्व चित्र; अनेक वर्षानंतर मिळणार सरपंच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पाच तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवारी (दि.२६) मतदान झाले. यात नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिलशील असलेल्या २० पैकी १३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचासह ८८ सदस्य अविरोध निवडून आले. एकाच निवडणुकीत एवढ्या संख्येने सरपंच आणि सदस्य निवडून येण्याची ही बहुदा जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच निवडणूक ठरली.बुधवारी मतदान झालेल्या चार ग्रामपंचायतींमध्ये सरासरी ७३.०८ टक्के मतदान झाले. त्यात अहेरी तालुक्यातील आवलसरी येथे ८३.११ टक्के, तर एटापल्ली तालुक्यातील सेवारी येथे ६५.६९ टक्के, सरखेडा येथे ७१.७३ टक्के आणि वडसा खुर्द येथे ७१.८० टक्के मतदान झाले. अतिसंवेदनशिल भाग असतानाही या मतदानादरम्यान कुठेही अनुचित घटना घडली नाही. सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती.राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार आॅक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. त्यात सरपंचपदासाठी थेट निवडणूक झाली. जिल्ह्याच्या दुर्गम भागात नक्षली दहशतीमुळे आतापर्यंत अनेक गावांत बºयाच वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कोणी अर्जच भरत नव्हते. मात्र बदलत्या परिस्थितीनुसार नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्यात प्रशासनाच्या अधिकाºयांना यश आले. तरीही २० पैकी ३ ग्रामपंचायतींमध्ये यावेळीही कोणीच नामांकन दाखल केले नाही. उर्वरित १७ पैकी १३ ग्रामपंचायतीत एकेका उमेदवाराचे नामांकन आल्यामुळे त्या जागा अविरोध निवडल्या गेल्या तर ४ ग्रामपंचायतींसाठी बुधवारी प्रत्यक्ष मतदान झाले.आवलमरी ग्रामपंचायतीत एका सदस्याची अविरोध निवड झाली. सेवारी ग्रामपंचायतीमध्ये एक सरपंच व दोन सदस्यांसाठी तीन प्रभागात निवडणूक झाली. सरखेडा ग्रामपंचायतीत तीन प्रभागात एक सरपंच व सहा सदस्य तसेच वडधा खुर्द ग्रामपंचायतीमध्ये एक सरपंच व सहा सदस्यांसाठी तीन प्रभागात मतदानाची प्रक्रिया घेण्यात आली. चार ग्रामपंचायतींना २१ सदस्य व चार सरपंच निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली.हे आहेत अविरोध ठरलेले सरपंचटेकला- मडावी रासो चिन्ना, नेलगुंडा- मज्जी भारती काशिनाथ, बोटनगुंडी- मडावी तारा मुत्ता, फोदेवाडा- रोषनी दामोधर फोदाळी, होडरी- हबका मिनाक्षी अशोक, धिरंगी- मुहंदा अविनाश पेका, कुव्वाकोडी- काळंगा बासू कट्टा, परायनार- कुसराम सरिता कैलास, मुगनेर- कोवा मनिराम रामजी, पिटेसूर- ताडामी चैनुराम गांडोराम, मोठा झेलिया- मडावी गांगसाय सुखराम, जवेली बु.- हिचामी दामजी रावजीमतदान केंद्रावर जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापरअतिसंवेदनशील एटापल्ली तालुक्यातील तीनही गावांचे मतदान यंत्र हेलिकॉप्टरने पेठा बेस कॅम्पवर पोहचवण्यात आले. गुरूवारी हे मतदान यंत्र सकाळी एटापल्लीला पोहोचवून मतमोजणी केली जाईल, असे निवडणूक अधिकाºयांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूकsarpanchसरपंच