शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

८६ हजारांची विदेशी दारू जप्त, एसडीपीओंच्या पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 19:11 IST

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोलीचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र जगदाडे यांनी आपल्या सहकारी कर्मचा-यांसह खरपुंडी नाक्याजवळ चारचाकी वाहनाला अडवून या वाहनातून ८६ हजार ४०० रूपयांची देशी, विदेशी दारू गुरूवारी जप्त केली.

गडचिरोली - मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोलीचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र जगदाडे यांनी आपल्या सहकारी कर्मचा-यांसह खरपुंडी नाक्याजवळ चारचाकी वाहनाला अडवून या वाहनातून ८६ हजार ४०० रूपयांची देशी, विदेशी दारू गुरूवारी जप्त केली.याप्रकरणी दारूविक्रेता प्रशांत ऊर्फ पिंटू मंडल (३२) रा. रामनगर, गडचिरोली याला अटक करून त्याचेवर मुंबई दारूबंदी कायद्याचे कलम ६५ (अ) व ९८ (क) अन्वये गडचिरोेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक जगदाडे यांना अशी माहिती मिळाली की, प्रशांत ऊर्फ पिंटू मंडल हा एमएच-३१-सीएम-४९४३ क्रमांकाच्या वाहनाने देशी, विदेशी दारूची वाहतूक आरमोरीकडून गडचिरोलीकडे करीत असल्याची माहिती मिळाली. सदर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांना पोलीस उपनिरीक्षक जगदाडे यांना दिली. त्यानंतर जगदाडे यांनी आपल्या सहकारी पोेलीस हवालदार नरूले, नाईक पोलीस शिपाई कोहपरे यांना घेऊन आरमोरी मार्गावर पाळत ठेवली. दरम्यान आरमोरीवरून एमएच-३१-सीएम-४९४३ क्रमांकाचे वाहन येताना दिसले. या वाहनाला खरपुंडी नाक्यावर थांबवून वाहनचालकाचे नाव विचारले असता, प्रशांत ऊर्फ पिंटू मंडल असे त्यांनी सांगितले. वाहनातून  देशी, विदेशी कंपनीच्या १८० मिली मापाच्या २८८ निपा आढळून आल्या. या दारूची किंमत ८६ हजार ४०० रूपये आहे. तर वाहनाची किंमत १ लाख ५५ हजार रूपये आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली