शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

८५६ अंगणवाड्यात पोहोचला गॅस

By admin | Updated: January 30, 2017 03:28 IST

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून गडचिरोली

इंधनाचा प्रश्न मार्गी : अमृत आहार योजनेचा स्वयंपाक झाला सुकर; १० हजारांवर लाभार्थ्यांना लाभ दिलीप दहेलकर ल्ल गडचिरोली भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १ हजार ८२९ अंगणवाडी केंद्रांना स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर मंजूर करण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत ८५६ अंगणवाडी केंद्रांमध्ये गॅस सिलिंडर पोहोचले आहे. त्यामुळे इंधनाचा प्रश्न मार्गी लागला असून स्वयंपाक सुकर झाला आहे. अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीमध्ये व स्तनदा मातेस बाळंतपणानंतर तिमाहीमध्ये एकवेळ चौरस आहार देण्यासाठी भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम आहार योजना १८ नोव्हेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने सुरू केली. या योजनेची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही सुरू आहे. त्या अनुषंगाने अंगणवाड्यांना गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, शेगडी व सुरक्षा पाईप पोहोचविण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यानुसार गॅस सिलिंडर वितरकांकडून गॅस सिलिंडर व इतर साहित्य गडचिरोली जिल्ह्याच्या अंगणवाड्यांमध्ये पोहोचविण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू झाले आहे. अमृत आहार योजनेंतर्गत जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील एकूण १ हजार ३५४ व ४७५ मिनी अंगणवाड्या अशा एकूण १ हजार ८२९ अंगणवाडी केंद्र समाविष्ट करण्यात आले आहेत. या अंगणवाड्यांमधून १० हजारवर गरोदर व स्तनदा माता एकवेळ चौरस आहाराचा लाभ घेत आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील २५३, आरमोरी तालुक्यातील ९९, भामरागड १३५, चामोर्शी १७३, देसाईगंज २८, धानोरा २९५, एटापल्ली २२०, गडचिरोली ५९, कोरची १५०, कुरखेडा १९१, मुलचेरा ५८ व सिरोंचा तालुक्यातील १६८ अंगणवाड्यांचा समावेश आहे. राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून १ हजार ३५२ अंगणवाड्या व ४५९ मिनी अंगणवाड्या अशा एकूण १ हजार ८११ अंगणवाडी केंद्रात गॅस शेगडी पोहोचली आहे. अद्यापही १८ अंगणवाडी केंद्रात शेगड्या पोहोचल्या नाहीत. यामध्ये अहेरी तालुक्यातील सात, भामरागड दोन, धानोरा सहा व एटापल्ली तालुक्यातील तीन अंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे. जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला व बाल कल्याण अधिकारी या योजनेच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेत आहेत. सर्वाधिक लाभार्थी अहेरी तालुक्यात ४अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत अहेरी तालुक्यात मिनी व मोठ्या अंगणवाड्या मिळून एकूण २५३ अंगणवाड्यांमध्ये आहार शिजविला जात आहे. ८१७ गरोदर व १ हजार ६७ स्तनदा माता अशा एकूण १ हजार ८३८ लाभार्थ्यांना आहाराचा लाभ दिला जात आहे. कुपोषणाची समस्या कमी होणार ४डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत गरोदर, स्तनदा माता व सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रातून आहार पुरविला जात असल्याने दुर्गम व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची चांगली सोय झाली आहे. गरीबी व अज्ञानामुळे आरोग्य शास्त्रानुसार पुरेसा आहार मिळत नसल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुपोषीत बालकांची संख्या अधिक आढळून येत होती. सदर आहार योजनेमुळे कुपोषणाची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. टप्पा दोन अंतर्गत ६३ हजार बालकांना लाभ ४५ आॅगस्ट २०१६ च्या शासन निर्णयान्वये सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील सर्व बालकांना अंडी, केळी व ऋतूमानानुसार फळे आदींचा अतिरिक्त आहार पुरविण्याची योजना दुसऱ्या टप्प्यांतर्गत कार्यान्वित करण्यात आली. या योजनेंतर्गत जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील एकूण १३ हजार ९६७ बालकांना अंडी, केळी आदींच्या आहाराचा लाभ दिला जात आहे. यामुळे बालकांची संख्या अंगणवाडीत वाढली आहे.