शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोरची तालुक्यात जंगली हत्तींचा उच्छाद; ८० वर्षीय वृद्ध महिलेला सोंडेत उचलून फेकले

By मनोज ताजने | Updated: October 21, 2022 14:24 IST

लेकुरबोडी गावातील घरांसह शेतातील पिकांचे नुकसान

कोरची (गडचिरोली) : तालुक्यात जंगली हत्तींच्या कळपाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील लेकुरबोडी गावात एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला हत्तीने सोंडेने उचलून फेकल्यामुळे ती महिला गंभीर जखमी झाली. यासोबतच एका घरासह शेतातील उभ्या पिकांचे नुकसान केले आहे.

गेल्यावर्षी छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करत धुमाकूळ घालणाऱ्या या हत्तींनी मधल्या काही काळात माघारी फिरून छत्तीसगड गाठले होते. पण जवळपास दोन महिन्यांपूर्वी पुन्हा हे हत्ती गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाले. धानोरा, देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घातल्यानंतर त्यांनी गोंदिया जिल्ह्यात प्रवेश केला होता. त्यानंतर आठवडाभरापासून कुरखेडा तालुक्याच्या सीमावर्ती भागात फिरून त्यांनी आता कोरची तालुक्यात धुमाकूळ सुरू केला आहे.

शुक्रवारच्या पहाटे लेकुरबोडी येथील घरांसह शेतातील पीकांची नासधूस करून एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला सोंडेने उचलून फेकले. त्यामुळे त्या महिलेची कंबर मोडली. शिवाय हातालाही जबर मार लागला आहे. शुक्रवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. सनकुबाई कोलुराम नरेटी (८०) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. तिला सकाळी ७:३० वाजता कोरची ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. डॉ.राहुल राऊत यांनी प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले.

सावधानता बाळगण्याचे आवाहन

गोंदिया जिल्ह्यातून परत आलेल्या या हत्तींनी पुन्हा छत्तीसगडच्या दिशेने आगेकुच केली आहे. पण वाटत कोरची तालुक्यातील मसेली परिसरातील लेकुरबोडी गावात नरेटी यांच्या घराची व घरातील धान्याची नासधूस केली. त्या घरात खाटेवर झोपून असलेल्या सनकुबाई कोलुराम नरेटी या वृद्ध महिलेला हत्तीने आपल्या सोंडेने उचलून फेकले. हे हत्ती गावापासून सहा-सात किलोमीटरच्या जंगलात आहेत. बेळगावचे वनपरिक्षेत्राधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे आपल्या चमुसह लेकुरबोडी व मसेली गाव परिसरात नागरिकांना सतर्क करीत असून हत्तीपासून दूर आणि सावध राहण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवGadchiroliगडचिरोली