वैरागड-वासाळा मार्गालगत असलेल्या संजय पात्रीकर यांच्या शेताजवळ अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती तालुका मुक्तिपथ संघटकाला मिळाल्यानंतर मुक्तिपथ आणि आरमोरी पोलिसांनी धाड टाकून ८० किलो मोहफुलाचा सडवा आणि १ लीटर दारू जप्त करण्यात आली. यातील आरोपी फर्मान इरफान अन्सारी रा. वैरागड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरमोरी तालुका मुक्तिपथने मागील महिनाभरात केलेली ही तिसरी कारवाई आहे. वैरागड, मेंढेबोडी येथे मोहफुलाची देशी, विदेशी दारू अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात विकल्या जाते; पण याकडे आरमोरी पोलिसांचे दुर्लक्ष आहे. मुक्तिपथने कारवाई केल्यानंतरच आरमोरी पोलीस संबंधितांवर गुन्हा दाखल करतात. पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, पोलीस अमलदार नैताम चौके, तालुका मुक्तिपथ संघटक नीलम हरिणखेडे, उपसंघटक प्रकाश कुनघाडकर यांनी ही कार्यवाही केली.
वैरागडात ८० किलो मोहफुलाचा सडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:37 IST