शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

८ हजार ४७२ घरकुले अपूर्ण

By admin | Updated: June 22, 2017 01:26 IST

राज्य शासनाच्या वतीने गेल्या चार-पाच वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घरकूल मंजूर करण्यात येत आहेत.

आवासच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचण : १२०० घरकुलांचे लाभार्थी अनुदानापासून वंचित दिलीप दहेलकर । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्य शासनाच्या वतीने गेल्या चार-पाच वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घरकूल मंजूर करण्यात येत आहेत. मात्र ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ अशी परिस्थिती आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सन २०१२-१३ ते २०१५-१६ या चार वर्षाच्या कालावधीतील मंजूर झालेले तब्बल ८ हजार ४७२ घरकुले अद्यापही अपूर्ण स्थितीत आहेत. ‘आवास’च्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचण असल्याने घरकुलाचे बांधकाम पूर्ण करूनही तब्बल १ हजार २७३ लाभार्थी घरकुलाच्या तिसऱ्या अनुदानापासून वंचित आहेत. पूर्वीच्या आवास व आताच्या प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी पंचायत समिती व जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेमार्फत गडचिरोली जिल्ह्यात ग्राम पंचायत स्तरावर सुरू आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात घरकूल बांधकामाच्या टप्प्यानुसार पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे अनुदान आॅनलाईन पद्धतीने वळते केले जाते. पहिल्या हप्त्याचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वळते झाल्यानंतर लाभार्थ्यांकडून घरकूल बांधकामाला गती दिली जाते. मात्र आवासच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल १ हजार २७३ लाभार्थी गेल्या चार वर्षांपासून तिसऱ्या हप्त्याच्या अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांसाठी आॅनलाईन वेतन प्रणाली डोकेदुखी ठरली आहे. राज्यातील एकही गरीब व बीपीएलधारक सर्वसामान्य कुटुंब हक्काच्या घरापासून वंचित राहू नये, तसेच सर्वांना स्थायी स्वरूपाचा निवारा मिळावा, या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारने पूर्वी इंदिरा आवास व आता प्रधानमंत्री आवास योजना कार्यान्वित केली. मात्र आॅनलाईन वेतन प्रणालीत अनेक त्रुटी असल्याने लाभार्थ्यांना वेळेवर अनुदानाची रक्कम प्राप्त होत नाही. याचा परिणाम थेट घरकुलाच्या बांधकामावर होत आहे. अनुदान वितरणाच्या प्रणालीतील या त्रुटींचा फटका केवळ गडचिरोलीच नाही तर इतरही जिल्ह्यांना बसत आहे. मुंबईतील कार्यशाळेत सॉफ्टवेअरच्या अडचणींवर सकारात्मक चर्चा विविध शासकीय योजनांमधून गडचिरोली जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेले हजारो घरकूल अपूर्ण असून अनेक लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात घरकुलाच्या बांधकामांना गती नाही. लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवून घरकुलाच्या कामाला गती देण्याच्या उद्देशाने गडचिरोलीच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने २० ते २२ जून रोजी मुंबई येथील मंत्रालयात कार्यशाळा आयोजित केली होती. सदर कार्यशाळेला गडचिरोली येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जी.एम. दहीकर यांच्यासह बाराही पं. स. स्तरावरील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व घरकूल योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी असणारे दोन कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेत सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे अडचणींवर विस्तृतपणे सकारात्मक चर्चा झाली. बँकेत लाभार्थ्यांच्या चकरा कायमच घरकुलाचे बांधकाम अर्ध्यापेक्षा अधिक केलेले, तसेच पूर्ण केलेले अनेक लाभार्थी अनुदानाची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा झाली काय, याची खातरजमा करण्यासाठी बँकेत चकरा मारत आहेत. तीन ते चारदा जाऊनही दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे अनुदान सरकारकडून जमा करण्यात आले नसल्याचे बँक व्यवस्थापक वारंवार सांगतात. त्यामुळे शेकडो घरकूल लाभार्थी निराश होऊन परत जात आहेत.