शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

फळझाडांची ७५ हजार रोपे उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 11:19 PM

फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभागाच्या रोपवाटीकांमधून सवलतीच्या दरात रोपटे उपलब्ध करून दिली जातात. पुढील पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील पाच शासकीय रोपवाटीकांमध्ये सुमारे ७४ हजार ७०८ रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देसवलतीत वितरण : आंब्याच्या झाडांची मागणी अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभागाच्या रोपवाटीकांमधून सवलतीच्या दरात रोपटे उपलब्ध करून दिली जातात. पुढील पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील पाच शासकीय रोपवाटीकांमध्ये सुमारे ७४ हजार ७०८ रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. ज्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी धानाची लागवड फायदेशिर ठरते. मात्र काही शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. अशा शेतात फळझाडांची लागवड केल्यास पडीक असलेली जमीन पिकाखाली येण्यास मदत होते. विशेष म्हणजे यातून शेतकºयाला अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्यास मदत होते.जिल्ह्यातील शेतजमीन व वातावरण आंबा, काजू, चिकू, पेरू, आवळा, सीताफळ, फणस, चिंच, कागदी लिंबू, शेवगा, करवंद आदी फळझाडांसाठी योग्य आहे. काही नागरिक आपल्या घरी या झाडांची लागवड करतात. त्याला चांगली फळे येतात. याच झाडांची बागेत लागवड केल्यास शेतकºयाला उत्पन्न मिळण्यास मदत होते. फळशेती ही येथील शेतकऱ्यांसाठी अतिशय नवीन बाब आहे. त्यामुळे फळशेतीची रोपटे उपलब्ध होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील पाच रोपवाटीकांमध्ये फळझाडांची रोपे लावण्यात आली आहेत.सदर रोपे पावसाळ्याच्या कालावधीत अत्यंत सवलतीच्या दरात शेतकºयांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सोनापूर येथील रोपवाटीकेत विविध फळझाडांची ८ हजार ९४१, वाकडी येथील रोपवाटीकेत २९ हजार ४५२, कृष्णनगर येथे १७ हजार ६४०, रामगड येथे ११ हजार २१५, कसनसूर येथील रोपवाटीकेत ६ हजार २७५ रोपे उपलब्ध आहेत. पाऊस पडल्यानंतर ही रोपे शेतकऱ्यांना सवलतीवर उपलब्ध होणार आहेत.शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरजगडचिरोली जिल्ह्यातील वातावरण फळपिकांसाठी लाभदायक असले तरी शेतकरी फळझाडांची लागवड करीत नाही. केवळ धानाची शेती केली जाते. पडिक जमिनीवर फळझाडांची लागवड झाल्यास शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. मात्र यासाठी शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र कृषी विभागाकडून शेतकºयांना मार्गदर्शन केले जात नाही. त्यामुळे शेतकरी फळबाग लागवडीची जोखीम उठविण्यास तयार होत नाही. विशेष म्हणजे फळबागेसाठी तारेचे कुंपन असणे आवश्यक आहे. या कुंपनासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. सदर तार अनुदानावर उपलब्ध झाल्यास शेतकरी फळशेतीकडे वळेल.