लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एसआरपीएफ जवानांसह सुमारे ७५ जणांचे कोरोना अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे हे सर्वजण संस्थात्मक विलगिकरणात होते. त्यामुळे आता एकुण कोरोनाबाधितांची संख्या २८१ झाली आहे. देसाईगंज येथील चार एसआरपीएफ जवान कोरोनामुक्तही झाले आहेत.मुलचेरा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांचा कोरोना अहवाल मागील आठवड्यात पॉझिटीव्ह आला होता. त्यांच्या संपर्कातील १९ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता, दोन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे या तिघांच्या एकूण संपर्कात आलेल्या ६६ नागरिकांचे नमूने तपासणीसाठी नागपूर प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे मोठा धोका टळला आहे.७२ एसआरपीएफ जवानांसह मुंबई येथील पोलीस विभागातच कार्यरत असलेल्या अन्य एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तसेच सायंकाळी आणखी दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे. देसाईगंज येथील चार एसआरपीएफ जवानांची पुनर्तपासणी केली असता, त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले. त्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सीआरपीएफ आणि एसआरपीएफ मिळून सव्वाशे पेक्षा जास्त जवान कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील काही जणांना रूग्णालयातून सुटी मिळाली आहे.
एकाच दिवशी ७५ पॉझिटिव्ह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST
संपर्कातील १९ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता, दोन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे या तिघांच्या एकूण संपर्कात आलेल्या ६६ नागरिकांचे नमूने तपासणीसाठी नागपूर प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे मोठा धोका टळला आहे.
एकाच दिवशी ७५ पॉझिटिव्ह !
ठळक मुद्देनवीन उच्चांक । एसआरपीफच्या ७२ जवानांसह ३ नागरिकांचा समावेश