शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त शेतकऱ्यांना 75 काेटींचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2022 23:02 IST

काही शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले हाेते, तर काहींचे राेवणे झाले हाेते. सतत तीन ते चारवेळा पुराचे पाणी शेतात शिरल्याने पीक पूर्णपणे वाहून गेले. काही शेतकऱ्यांच्या धानाच्या बांध्यांमध्ये पुराचा गाळ साचला. या गाळात धान पीक नष्ट झाले. काही शेतकऱ्यांना दाेन ते तीनवेळा धानाची राेवणी करावी लागली. नुकसानग्रस्त शेतकरी निधीची प्रतीक्षा करीत हाेते. आठ दिवसांपूर्वी शासनाने निधी उपलब्ध करून दिला.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जुलै महिन्यात आलेल्या पुरामुळे गडचिराेली जिल्ह्यातील  शेतीचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांच्या शेतात दाेन ते तीनवेळा पुराचे पाणी शिरले. या शेतकऱ्यांना सुमारे ७५ काेटी २९ लाख रुपयांची मदत शासनामार्फत प्राप्त झाली आहे. मदतीचे वितरण तहसीलमधून केली जात आहे.पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीलाच पावसाने जिल्ह्याला झाेडपून काढले. तसेच मध्य प्रदेश व विदर्भातही मुसळधार पाऊस झाल्याने धरणांचे पाणी वैनगंगा नदीत साेडण्यात आले. याच कालावधीत प्राणहिता व गाेदावरी नदीलाही पूर आला. खरीप पिकांची नुकतीच पेरणी झाली हाेती आणि पुराचा फटका बसला. काही शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले हाेते, तर काहींचे राेवणे झाले हाेते. सतत तीन ते चारवेळा पुराचे पाणी शेतात शिरल्याने पीक पूर्णपणे वाहून गेले. काही शेतकऱ्यांच्या धानाच्या बांध्यांमध्ये पुराचा गाळ साचला. या गाळात धान पीक नष्ट झाले. काही शेतकऱ्यांना दाेन ते तीनवेळा धानाची राेवणी करावी लागली.नुकसानग्रस्त शेतकरी निधीची प्रतीक्षा करीत हाेते. आठ दिवसांपूर्वी शासनाने निधी उपलब्ध करून दिला. या निधीची वितरण तहसील स्तरावरून केले जात आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमासुद्धा झाली आहे.  काही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने त्यांच्या खात्यात रक्कम जमा हाेण्यास अडचण जात आहे.

काही शेतकऱ्यांच्या येरझारा  

काही शेतकऱ्यांच्या बँक खात्याची समस्या असल्याने त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. असे शेतकरी बँक, तहसील कार्यालय किंवा तलाठी यांच्याकडे येरझारा मारत असल्याचे दिसून येत आहेत. मदतीची    रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. अशा शेतकऱ्यांची दिवाळी गाेड हाेणार आहे.

चामाेर्शी तालुक्याला सर्वाधिक मदत चामाेर्शी हा जिल्ह्यातील सर्वात माेठा तालुका आहे. या तालुक्याच्या सीमेवरून वैनगंगा नदी वाहते. वैनगंगेच्या अनेक उपनद्या आहेत. या नद्यांना पूर आल्याने चामाेर्शी तालुक्यातील ११ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचे नुकसान झाले. या तालुक्यातील शेतकऱ्यांना २४ काेटी १६ लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांना दुप्पट लाभनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने २२ ऑगस्ट २०२२ राेजी शासन निर्णय काढला आहे. यात दुप्पट मदत दिली जाणार आहे. काेरडवाहू शेतीचे नुकसान झाल्यास पूर्वी प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपये एवढी मदत दिली जात हाेती. त्यात वाढ करून यावर्षी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये देण्यात आले. ओलिताखालील शेतीचे नुकसान झाल्यास पूर्वी प्रतिहेक्टरी १३ हजार ५०० रुपये एवढी मदत दिली जात हाेती. त्यात वाढ करून यावर्षी प्रतिहेक्टरी २७ हजार रुपये देण्यात आले.पूर्वी दाेन हेक्टरपर्यंतच मदत दिली जात हाेती. आता मर्यादा तीन हेक्टरपर्यंत वाढविण्यात आली. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती