देसाईगंज - देसाईगंज तालुक्यातील एकूण १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. ५९ प्रभागांमध्ये १६१ ग्रामपंचायत सदस्य निवडून द्यायचे आहेत. यासाठी ३६८ उमेदवारांनी नामांकन सादर केले हाेते. त्यापैकी तीन नामांकन छाननीअंती अवैध ठरले. त्यामुळे ३६५ उमेदवार शिल्लक राहिले हाेते. ४ जानेवारी राेजी २५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र मागे घेतले. २६ जागांसाठी एकच नामांकन प्राप्त झाल्याने या जागांची निवडणूक बिनविराेध झाली. आता ३१४ उमेदवार रिंगणात आहेत.
अहेरी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. ९९ प्रभागातून २७३ सदस्य निवडून द्यायचे हाेते. त्यासाठी ८३१ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले. नऊ नामनिर्देशन अवैध ठरल्याने ८२२ नामनिर्देशन वैध ठरले. ७० उमेदवारांनी नामनिर्देशन मागे घेतले तर, १० जागांसाठी एकच नामनिर्देशन प्राप्त झाले. आता केवळ ७४२ उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामीण भागात आता प्रचाराला वेग आला आहे.