जि. प. पोटनिवडणूक : चार उमेदवारांचे भाग्य मशीनबंदगडचिरोली : निवडणूक विभागाच्या वतीने बुधवारी मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राची पोटनिवडणूक घेण्यात आली. यात ७.३० ते ३ वाजेपर्यंत १७ मतदान केंद्रावरून एकूण ९ हजार १८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. मतदानाची टक्केवारी ७३.६४ आहे. गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी पी. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार डी. जी. जाधव, नायब तहसीलदार पी. पी. इंदूरकर, न. प. चे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांच्या सहकाऱ्याने चोख पोलीस बंदोबस्तात जि. प. पोटनिवडणुकीत मतदान प्रक्रिया घेण्यात आली. मौशीखांब (२०/१) मतदान केंद्रात एकूण ७४२ मतदार संख्या आहे. यापैकी पुरूष २९३ व स्त्री २७८ अशा एकूण ५७१ मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी ७६.९५ आहे. मौशीखांब (२०/२) मतदान केंद्रात एकूण ६६३ मतदार आहेत. यापैकी पुरूष २५१ व स्त्री २२३ अशा एकूण ४७४ मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी ७१.४९ आहे. बेलगाव मतदान केंद्रात एकूण १ हजार १७२ मतदार संख्या आहे. यापैकी पुरूष ४४५, स्त्री ४२५ अशा एकूण ८७० मतदारांनी या मतदान केंद्रावर मतदान केले. याची टक्केवारी ७४.२३ आहे. अमिर्झा (२०/४) केंद्रात एकूण १ हजार १३२ मतदार संख्या आहे. यापैकी पुरूष ३९१, स्त्री ३६९ असे एकूण ७६० मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी ६७.१४ आहे. अमिर्झा (२०/५) केंद्रात एकूण ४११ उमेदवारांची संख्या आहे. यापैकी पुरूष १७०, स्त्री १४२ अशा एकूण ३१२ मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी ७५.९१ आहे. अमिर्झा (२०/६) मतदान केंद्रात एकूण मतदारांची संख्या ६५५ आहे. यापैकी पुरूष २२९, स्त्री २३६ असे एकूण ४६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून याची टक्केवारी ७०.९९ आहे. टेंभा (२०/७) मतदान केंद्रात एकूण मतदारांची संख्या ५८० आहे. यापैकी पुरूष २३४, स्त्री २१८ अशा एकूण ४५२ मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी ७७.९३ आहे. टेंभा (२०/८) मतदान केंद्रात मतदाराची एकूण संख्या ६४२ आहे. यापैकी पुरूष २३१, स्त्री २३३ अशा एकूण ४६४ मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी ७२.२७ आहे. चांभार्डा मतदान केंद्रात एकूण मतदारांची संख्या ७७० आहे. यापैकी पुरूष २९९, स्त्री ३०२ अशा एकूण ६०१ मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी ७८.०५ आहे. मुरमाडी (२०/१०) मतदान केंद्रात एकूण मतदारांची संख्या ६६० आहे. यापैकी पुरूष २४० व स्त्री २१४ असे एकूण ४५४ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६८.७९ आहे. मुरमाडी (२०/११) मतदान केंद्रात मतदारांची एकूण संख्या ५३५ आहे. यापैकी पुरूष २०६, स्त्री १८५ असे एकूण ३९१ मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी ७३.०८ आहे. मरेगाव मतदान केंद्रात मतदारांची एकूण संख्या ८२९ आहे. या केंद्रावर पुरूष ३३२ व स्त्री ३०९ असे एकूण ६४१ मतदारांनी मतदान केले. या केंद्रावर ७७.३२ टक्के मतदान झाले. गिलगाव मतदान केंद्रात मतदारांची एकूण संख्या ८३७ आहे. या केंद्रावर पुरूष ३१६, स्त्री ३०१ अशा एकूण ६१७ मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी ७३.७२ आहे. कळमटोला मतदान केंद्रात मतदाराची एकूण संख्या ५२९ आहे. या केंद्रावर पुरूष २२०, स्त्री १८० अशा एकूण ४०० मतदारांनी मतदान केले. या केंद्रावरील मतदानाची टक्केवारी ७५.६१ आहे. आंबेटोला मतदान केंद्रात मतदारांची एकूण संख्या ८८९ आहे. या केंद्रावर पुरूष ३५२, स्त्री ३०७ अशा एकूण ६५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याची टक्केवारी ७४.१३ आहे. आंबेशिवणी (२०/१६) मतदान केंद्रात मतदारांची एकूण संख्या ९४९ आहे. या केंद्रावर पुरूष ३९०, स्त्री ३१५ अशा एकूण ७०५ मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी ७४.२९ आहे. आंबेशिवणी (२०/१७) केंद्रात मतदारांची एकूण संख्या ४७६ आहे. या केंद्रावर पुरूष १८२ व स्त्री १६६ अशा एकूण ३४८ मतदारांनी मतदान केले. या केंद्रावरील मतदानाची टक्केवारी ७३.११ आहे. या पोटनिवडणुकीत ४ हजार ७८१ पुरूष मतदारांनी मतदान केले असून पुरूष मतदाराच्या मतदानाची टक्केवारी ७४.३५ आहे. या निवडणुकीत ४ हजार ४०३ स्त्री मतदारांनी मतदान केले असून स्त्री मतदाराच्या मतदानाची टक्केवारी ७२.८९ आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
७३.६४ टक्के मतदान
By admin | Updated: January 28, 2015 23:31 IST