शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

राज्यातील ७३,३८४ कुटुंबांचे धूरमुक्त स्वयंपाकाचे स्वप्न धूसर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 14:08 IST

महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये (आकांक्षित जिल्हे) विस्तारित ग्रामस्वराज अभियान राबविले जात आहे. या अभियानात चारही जिल्ह्यात ‘उज्ज्वला’ योजनेतून गॅस कनेक्शन वाटण्याचे उद्दिष्ट ४८.५४ टक्के पूर्ण झाले आहे. अजूनही ७३ हजार ३८४ कुटुंबांना धूरयुक्त स्वयंपाकातून मुक्ती मिळालेली नाही.

ठळक मुद्दे४८ टक्के लक्ष्यपूर्ती राज्यातल्या चार आकांक्षित जिल्ह्यातील स्थिती

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशातील ११५ मागास जिल्ह्यांत मोडणाऱ्या महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये (आकांक्षित जिल्हे) विस्तारित ग्रामस्वराज अभियान राबविले जात आहे. या अभियानात चारही जिल्ह्यात ‘उज्ज्वला’ योजनेतून गॅस कनेक्शन वाटण्याचे उद्दिष्ट ४८.५४ टक्के पूर्ण झाले आहे. अजूनही ७३ हजार ३८४ कुटुंबांना धूरयुक्त स्वयंपाकातून मुक्ती मिळालेली नाही. नंदूरबार जिल्हा उद्दिष्टपूर्तीत सर्वाधिक पिछाडीवर आहे.गडचिरोली, वाशिम, उस्मानाबाद आणि नंदूरबार या राज्यातील चार आकांक्षित जिल्ह्यांमध्ये १ जूनपासून विस्तारित ग्रामस्वराज्य अभियान राबविले जात आहे. येत्या १५ आॅगस्टपर्यंत सदर जिल्ह्यांमध्ये १ लाख ४२ हजार ६२५ कुटुंबांमध्ये नवीन गॅस कनेक्शन वितरित केले जाणार होते. पैकी गेल्या दोन महिन्यात ६९ हजार २४१ कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले. योजनेचा कालावधी १५ दिवस शिल्लक आहे. उद्दीष्टपूर्तीसाठी ७३ हजार ३८४ कुटुंबांना कनेक्शन द्यावे लागणार आहे. अंत्योदय योजनेचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील सर्व कुटुंब तसेच वनवासी (वनालगत राहणाऱ्या गावातील) लोकांना हे गॅस कनेक्शन दिले जात आहे. मात्र योजनेची गती पाहता निर्धारित कालावधीत उद्दिष्टपूर्ती होण्याची शक्यता कमीच आहे.

सबसिडीतून कापणार गॅस व शेगडीचे पैसेया योजनेतून मोफत गॅस कनेक्शन दिले जात असल्याचा देखावा केला जात असला तरी प्रत्यक्षात सिलिंडरमधील गॅस, शेगडी, रेग्युलेटर आदींचे पैसे संबंधित कनेक्शनधारकाला दिल्या जाणाऱ्या सबसिडीतून परस्पर कापले जाणार आहेत. केवळ सुरूवातीची डिपॉझिट रक्कम १६०० रुपये, पाईप आणि कनेक्शन जोडणीचे २०० रुपये एवढेच मोफत आहे.

दुर्गम भागात रिफिलिंग कसे करणार?अनेक ठिकाणी शिबिरे घेऊन कुटुंबातील महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन दिले जात आहे. वनालगतच्या गावातील, दुर्गम भागातल्या गावांमधील कुटुंब लाभार्थी आहेत. सुरूवातीला त्यांना भरलेले सिलिंडर दिले जात असले तरी एकदा सिलिंडर संपल्यानंतर रिफिलिंग केलेले दुसरे सिलिंडर मिळण्याची सोय गावाच्या जवळपास कुठेच नाही. त्यामुळे लाभार्थ्यांवर पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येऊ शकते. अशा स्थितीत ही योजना कितपत यशस्वी ठरणार यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर