शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

७०० वर सिंचन विहिरींची कामे अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:24 IST

शेतीला सिंचन सुविधा निर्माण होऊन उत्पादन वाढावे, जेणे करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, या उद्देशाने शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरी बांधण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनरेगा अंतर्गत जिल्ह्याला दीड हजार विहिरींचे उद्दिष्ट : कुशल कामाच्या निधीअभावी २७० विहिरींची कामे रखडली

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतीला सिंचन सुविधा निर्माण होऊन उत्पादन वाढावे, जेणे करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, या उद्देशाने शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरी बांधण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत ७२४ सिंचन विहिरींचे काम अपूर्ण स्थितीत असून केंद्र शासनाच्या कुशल कामाच्या निधीअभावी २७० सिंचन विहिरींचे काम तुर्तास रखडले असल्याची माहिती हाती आली आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला सन २०१६-१७ व २०१७-१८ अशी दोन वर्ष मिळून एकूण १ हजार ५०० सिंचन विहिरींचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये अहेरी तालुक्याला १५२, आरमोरी १४७, भामरागड ८५, चामोर्शी १६२, देसाईगंज ५५, धानोरा १४५, एटापल्ली १५२, गडचिरोेली १४५, कोरची ११५, कुरखेडा १४२, मुलचेरा ११५ व सिरोंचा तालुक्यात ८५ विहिरींचा समावेश आहे. १ एप्रिल २०१६ ते २५ एप्रिल २०१८ पर्यंत १ हजार ५०० पैकी ७९० सिंचन विहिरींचे काम पूर्ण करण्यात आले.अहेरी तालुक्यात १२७ विहिरींचे काम पूर्ण करण्यात आले असून ५१ विहिरींचे काम अपूर्ण स्थितीत आहेत. आरमोरी तालुक्यात १५७ विहिरी पूर्ण झाल्या असून १७० विहिरींचे काम अर्धवट स्थितीत आहे. भामरागड तालुक्यात २६ विहिरींचे काम पूर्ण झाले असून २८ विहिरींचे काम अपूर्ण स्थितीत आहेत. चामोर्शी तालुक्यात ३५ विहिरी पूर्ण करण्यात आल्या असून ७ विहिरींचे काम अपूर्ण स्थितीत आहे. देसाईगंज तालुक्यात १४८ विहिरींचे काम पूर्ण झाले असून २८ विहिरी अपूर्ण स्थितीत आहे. धानोरा तालुक्यात २४ विहिरी पूर्ण झाल्या असून तब्बल ८३ विहिरींचे काम अपूर्ण स्थितीत आहे. एटापल्ली तालुक्यात ४३ विहिरी पूर्ण झाल्या असून ५२ विहिरी अपूर्ण स्थितीत आहे. गडचिरोली तालुक्यात ३४ कामे पूर्ण झाली असून ४४ कामे अपूर्ण स्थितीत आहे. कोरची तालुक्यात ५९ विहिरी पूर्ण झाल्या असून ८७ विहिरी अपूर्ण स्थितीत आहे.कुरखेडा तालुक्यात ६८ विहिरी पूर्ण झाल्या असून १०० विहिरी अर्धवट स्थितीत आहे. मुलचेरा तालुक्यात २७ विहिरींचे काम पूर्ण झाले असून १८ कामे अपूर्ण स्थितीत आहेत. सिरोंचा तालुक्यात केवळ तीन विहिरींचे काम अपूर्ण असून ४२ विहिरींचे काम आतापर्यंत पूर्ण करण्यात आले आहे.केंद्र शासनाकडून सदर सिंचन विहिरींच्या कुशल कामाचा निधी अप्राप्त असल्याने २७० विहिरींचे काम थंडबस्त्यात आहे. या २७० विहिरींमध्ये आरमोरी तालुक्यातील सर्वाधिक १०३, अहेरी २४, चामोर्शी ११, देसाईगंज १८, धानोरा २८, एटापल्ली १६, गडचिरोली ११, कोरची २७, कुरखेडा २८, मुलचेरा व सिरोंचा तालुक्यात दोन विहिरींचे काम थंडबस्त्यात आहे. सद्य:स्थितीत ९५ विहिरींच्या कामांवर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक निधी खर्च झाला आहे. २५ ते ५० टक्क्यापेक्षा जास्त निधी खर्च झालेल्या विहिरींची संख्या १८५ आहे.रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना विहिरींच्या बांधकामासाठी शासनाकडून २ लाख ९० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. गेल्या पाच-सात वर्षांत नरेगाच्या योजनेतून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरी बांधण्यात आल्या. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागामार्फत धडक सिंचन विहीर योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेतूनही शेकडो विहिरींचे काम मंजूर करण्यात आले आहे. मात्र सदर विहीर बांधकामासाठी आवश्यक असलेले साहित्य वाजवी दरात व सहज आणि वेळेवर मिळत नसल्याने लाभार्थी शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचे बांधकाम गतीने पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी येतात. यासंदर्भात संबंधित प्रशासकीय यंत्रणेने तोडगा काढण्याची गरज आहे.केंद्र शासनाने सिंचन विहिरीच्या कुशल कामाचा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून सिंचन विहिरींचे काम पूर्ण करता येईल, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांनी केली आहे. यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे.५७ सिंचन विहिरी राहणार अपूर्णचरोजगार हमी योजनेअंतर्गत १ हजार ५०० सिंचन विहिरींपैकी जिल्ह्यातील ५७ सिंचन विहिरींचे काम विविध कारणांमुळे कायमस्वरूपी थंडबस्त्यात राहण्याची शक्यता आहे. यामध्ये नऊ सिंचन विहिरींना खोदकामादरम्यान दगड लागला. यामध्ये अहेरी तालुक्यातील एक, चामोर्शी एक, एटापल्ली दोन, धानोरा दोन व कुरखेडा तालुक्यातील तीन विहिरींचा समावेश आहे. लाभार्थ्यांच्या उदासीनतेमुळे १३ सिंचन विहिरींचे काम सुरू होऊ शकले नाही. १९ सिंचन विहिरी नगर पंचायत क्षेत्रात समाविष्ट असल्यामुळे या सिंचन विहिरींचे भवितव्य अंधारात आहे. तब्बल १६ सिंचन विहिरींचे काम विविध कारणांमुळे थंडबस्त्यात पडले आहे. प्रशासकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ५७ सिंचन विहिरींचे काम पूर्ण होण्याची शक्यता मावळली आहे.काम पूर्ण करण्यास ३० जूनपर्यंत मुदतमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात हजारो सिंचन विहिरींचे काम मंजूर करून ते हाती घेण्यात आले आहे. प्रशासकीय यंत्रणेमार्फतही लाभार्थ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून विहिरींचे बांधकाम गतीने करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शासनाकडून अपूर्णस्थितीत असलेल्या ७२४ सिंचन विहिरींचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेकडून दर आठवड्याला विहिरींच्या बांधकामाच्या स्थितीची माहिती घेतली जात आहे. यासाठी नरेगाच्या आयुक्तालय कार्यालयाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने नरेगाच्या नागपूर विभागाच्या आयुक्तांचे पत्र जि. प. च्या प्रशासकीय यंत्रणेला नुकतेच प्राप्त झाले आहे.