शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

६७ गावे रस्त्यांविना

By admin | Updated: July 9, 2017 02:15 IST

कोरची, कुरखेडा, भामरागड, अहेरी, धानोरा, मुलचेरा तालुक्यासह जिल्हाभरातील तब्बल ६७ गावांना

बस सेवेचा अभाव : खासगी वाहनाने खडतर व धोकादायक प्रवास दिलीप दहेलकर । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कोरची, कुरखेडा, भामरागड, अहेरी, धानोरा, मुलचेरा तालुक्यासह जिल्हाभरातील तब्बल ६७ गावांना जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा या गावापर्यंत पोहोचली नाही. परिणामी या गावातील नागरिकांना अद्यापही खासगी वाहनाने धोकादायक प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने काही दिवसांपूर्वी प्राथमिक स्तरावर सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर रस्ते नसलेल्या गावांचा अहवाल तयार करण्यात आला. सदर अहवाल राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागीय कार्यालयाला नुकताच प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार, जिल्ह्यातील तब्बल ६७ गावांना (खेडे) जाण्यासाठी रस्ता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या गावांना जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाची बसफेरीही नाही. त्यामुळे या गावातील व परिसरातील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. रस्ता नसलेल्या गावांमध्ये भामरागड तालुक्यातील वासामुंडी, कहेकापरी, कोडापे, पदहूर, पोकूर, तिरकामेटा, पेरमलभट्टी, जोनावाही, मर्दहूर, वेगदूर, कोरपरशी, पुंगासूर, दिरंगी, गौरनूर, कुसनसूर, गोपनार, गुंडूरवाही, विसामुंडी, गुंडापुरी, दामनमरका, कवंडे, फोदेवाडा, अहेरी तालुक्यातील पेरकाभट्टी, तिमरम, आसली, चितवेल्ली तसेच धानोरा तालुक्यातील रायडोंगरी, मुरझर, डोंगरहूर, लाटझोरा, परसविहीर, चारवाही, दराची, बंधूर, गटानेली, पावरवेल, भटमऱ्हान, रेगादंड, पदाबोरीया आदी गावांचा समावेश आहे. मुलचेरा तालुक्यातील मोरखंडी, गंगापूर तसेच कोरची तालुक्यातील बोटेझरी, मोठा झेलिया, नारकसा, टेकामेटा, चांदागोटा, आरमोरी तालुक्यातील चवेला, कुरखेडा तालुक्यातील कुमळपार रिठ, तर गडचिरोली तालुक्यातील नागवेल्ली आदी गावांचा समावेश आहे. या गावांना जाण्यासाठी बस सुविधा नसल्याने खासगी वाहनाने क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक सुरू आहे. लोक प्रतिनिधी सुस्त, जिल्हा प्रशासन उदासीन गडचिरोली जिल्हा निर्मितीला आता ३४ वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील ६७ गावांना जाण्यासाठी पक्के रस्ते नाही. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची बससेवा या गावापर्यंत पोहोचली नाही. संबंधित गावांसाठी पक्के रस्ते तयार करून बससेवा देण्याकरिता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी फारसा पुढाकार घेतला नाही. या कामी जिल्हा प्रशासनही उदासीन असल्याचे दिसून येते. त्यामुळे ६७ गावातील नागरिकांना पायवाटेनेच आवागमन करावे लागत आहे. पेंढरी भागातील ३० गावे बसपासून वंचित धानोरा तालुक्यातील पेंढरीपासून छत्तीसगड राज्यातील पाखांजूरचे अंतर ३० किमी आहे.महामंडळाच्या गडचिरोली आगाराची बस गडचिरोली-पेंढरी मार्गे अहेरी जाते. तीन बसफेऱ्या असून दुपारी ३.३० वाजता गडचिरोलीवरून सुटणारी बस पेंढरी येथे मुक्कामी असते. मात्र पेंढरी गावाच्या पुढे पाखांजूरकडे महामंडळाची एकही बस जात नाही. त्यामुळे पेंढरी परिसरातील ३० ते ३५ गावे गेल्या अनेक वर्षांपासून बस सुविधेपासून वंचित आहे. पेंढरी परिसरात दोरगट्टा, दूर्गापूर, झाडापापडा, बोटेहूर तसेच इतर गावांचा समावेश आहे. पेंढरीच्या पुढे महामंडळाची बस जात नसल्याने एटापल्ली तालुक्यातील काही गावे बस सुविधेपासून वंचित आहे. पेंढरी ते पाखांजूर अशी खासगी बससेवा चालते. तसेच छत्तीसगड बस महामंडळाच्या बसफेऱ्याही सुरू आहेत. पेंढरी भागातील लोकांचा छत्तीसगड राज्याच्या पाखांजूर परिसरातील नागरिकांशी नेहमी संबंध येतो. महाराष्ट्र व छत्तीसगड या दोन राज्यात रोटीबेटी तसेच बाजारपेठेच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार सुरू आहे. मात्र पेंढरीच्या पुढे पाखांजूरकडे महामंडळाची बस नसल्याने प्रवास करण्यास नागरिकांना मोठी अडचण जात आहे. परिणामी पेंढरी भागातील नागरिकांना खासगी वाहनाने धोकादायक प्रवास करावा लागत आहे. महाराष्ट्राच्या परिवहन महामंडळाने बससेवा सुरू करावी, अशी मागणी पाखांजूर येथील सुकलाल सरकार यांनी केली आहे. परमिट नसल्याने बससेवा नाही महामंडळाच्या गडचिरोली आगाराची बसफेरी गडचिरोलीवरून पेंढरीपर्यंत जाते. मात्र पेंढरीच्या पुढे छत्तीसगड राज्यातील पाखांजूरकडे जात नाही. गडचिरोली-पेंढरी-पाखांजूर हा मार्ग सुस्थितीत आहे. मात्र छत्तीसगड राज्यात बससेवा देण्यासाठी एमएसआरटीसीला परमिट नाही. त्यामुळे गडचिरोली आगाराला पेंढरीच्या पुढे पाखांजूरकडे बससेवा देता येत नाही. सीजीएसआरटीसी व एमएसआरटीसीची संयुक्त बैठक होऊन त्यात मान्यता मिळणे गरजेचे आहे. त्यानंतर बस वाहतुकीचा परवाना मिळाल्यानंतर बससेवा सुरू होऊ शकते, अशी माहिती गडचिरोलीच्या एसटी विभागीय कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र व छत्तीसगड राज्यातील लोकांचा रोटीबेटी व्यवहार आहे. तसेच विविध वस्तू खरेदीच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारही आहे. मात्र राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा पेंढरीनंतर छत्तीसगड राज्यातील पाखांजूरपर्यंत नाही. त्यामुळे पेंढरी परिसरातील २५ ते ३० गावांसाठी बससुविधा नाही. परिणामी या भागातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने गडचिरोली-पाखांजूर अशी बसफेरी सुरू करावी. - श्रीनिवास दुलमवार, सदस्य, गट्टा-पेंढरी जि.प. क्षेत्र