शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

खरीपात ६० टक्के कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 06:00 IST

यावर्षी जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामासाठी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. हे उद्दीष्ट ६०.३६ टक्के गाठण्यात आले. २३ हजार २५६ शेतकऱ्यांना ९५ कोटी १९ लाखांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. त्यात सर्वाधिक कर्जवाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले. या बँकेने ५५ कोटी ७५ लाखांच्या कर्जवाटपाच्या उद्दीष्टापैकी ५१ कोटी ७९ लाखांचे कर्जवाटप केले.

ठळक मुद्देराष्ट्रीयीकृत बँका माघारल्या : जिल्हा बँकेने गाठले ९२.९० टक्के उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी सहकार विभागाने ठरवून दिलेले पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ६०.३६ टक्के गाठण्यात बँकांना यश आले. ३१ ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जवाटपाचे केवळ ४०.४० टक्के उद्दिष्ट गाठले तर जिल्हा सहकारी बँकेने सर्वाधिक ९२.९० टक्के कर्जवाटप करून याही वर्षी आघाडी घेतली आहे.यावर्षी जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामासाठी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. हे उद्दीष्ट ६०.३६ टक्के गाठण्यात आले. २३ हजार २५६ शेतकऱ्यांना ९५ कोटी १९ लाखांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. त्यात सर्वाधिक कर्जवाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले. या बँकेने ५५ कोटी ७५ लाखांच्या कर्जवाटपाच्या उद्दीष्टापैकी ५१ कोटी ७९ लाखांचे कर्जवाटप केले. हे कर्ज १६ हजार ५३ शेतकऱ्यांना देण्यात आले.राष्ट्रीयीकृत बँकांना ७७ कोटी ६७ लाखांचे कर्जवाटपाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी ३१ कोटी ७१ लाख वाटप झाले. हे कर्ज ५३६८ शेतकºयांना देण्यात आले. अ‍ॅक्सिस व आयसीआयसीआय या खासगी बँकांनी तर शेतकऱ्यांना जेमतेम १६.१६ टक्केच कर्जवाटप केले. त्यांनी अवघ्या सात शेतकऱ्यांना ३२ लाखांचे पीक कर्ज दिले. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने १८३५ शेतकºयांना ११ कोटी ६९ लाखांचे कर्जवाटप करत ५३.६९ टक्के उद्दीष्ट गाठले आहे.रबी हंगामासाठी यावर्षी जिल्ह्यातील सर्व बँकांना मिळून २३ कोटी १८ लाखांचे उद्दीष्ट दिले आहे. हे उद्दीष्ट कोणत्या बँका किती प्रमाणात गाठतात याकडे शेतकरी व सहकार विभागाचे लक्ष लागले आहे.पाच हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतकर्जमाफीची घोषणा होऊन दोन वर्षे झाली तरी अजून ५ हजार पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. जिल्ह्यात ४० हजार ४०० शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र ठरविले आहे. त्यापैकी ३५ हजार ३३१ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून उर्वरित शेतकरी प्रतीक्षेत आहेत. प्राप्त माहितीनुसार, कर्जमाफीसाठी पुरेसा निधी सध्या सरकारकडे नाही. बँकांनी त्यासंबंधीचे पत्र सरकारकडे पाठविले आहे. परंतू निधीअभावी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकलेला नाही.गेल्यावर्षीपेक्षा कर्जवाटपात घटगेल्यावर्षीच्या कर्जमाफीनंतर यावर्षी कर्जाचे प्रमाण वाढण्याऐवजी कमी झाले. कर्जवाटपाचे लक्ष्यच कमी देण्यात आल्याने वाटपही घटले. गेल्यावर्षीच्या खरीप हंगामासाठी २०२ कोटी ९१ लाख कर्जवाटपाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ५२.५६ टक्के उद्दीष्ट गाठत २५ हजार ५४१ शेतकऱ्यांना १०६ कोटी ६४ लाखांचे कृषी कर्ज वाटण्यात आले.यावर्षी मात्र कर्जवाटपाचे लक्ष्य घटवून १५७ कोटी ७० लाख केले होते. त्यापैकी ६०.३६ टक्के लक्ष्य गाठत ९५ कोटी १९ लाखांचे कर्ज वाटण्यात आले. कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही कमी होऊन २३ हजार २५६ वर आली आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी