शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

५८ लाख ८३ हजारांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:48 IST

कोटगूल पोलीस मदत केंद्राच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील खुर्शीपार येथे धाड टाकून सुमारे ५८ लाख ८३ हजार ४५० रुपयांची दारू जप्त केली आहे. सदर कारवाई १६ मार्च रोजी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोटगूल पोलीस मदत केंद्राच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील खुर्शीपार येथे धाड टाकून सुमारे ५८ लाख ८३ हजार ४५० रुपयांची दारू जप्त केली आहे. सदर कारवाई १६ मार्च रोजी करण्यात आली.खुर्शीपार येथील तिलक बाबुराव उंदीरवाडे (३४) हा आपल्या राहत्या घरी दारूची विक्री करीत आहे. सदर दारू कोरची येथील निर्मल धमगाये, ममता निर्मल धमगाये व नितीन उर्फत तरूण निर्मल धमगाये सर्व रा. कोरची यांनी उंदीरवाडे याच्याकडे २० दिवसांपूर्वी किरकोळ व ठोक विक्रीसाठी आणून ठेवली असल्याची गोपनिय माहिती कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांना प्राप्त झाली. कोटगूल पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक तुषार सूर्यकांत भोसले यांच्या पथकाने उंदीरवाडे याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरी २५ हजार ५० रुपये किंमतीची दारू आढळून आली. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या तुलनेत उंदीरवाडे याच्या घरी अत्यंत कमी प्रमाणात दारू आढळून आली. उंदीरवाडे याच्याकडे अधिक विचारणा केली असता, उर्वरित दारूसाठा केवळराम तुलावी याच्या घरी ठेवला असल्याचे सांगितले. केवळराम तुलावीच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या पडक्या कवेलुच्या घरात सुमारे ५८ हजार ५८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. दोघांकडे आढळलेल्या एकूण मालाची किंमत ५८ लाख ८३ हजार ४५० रुपये होते. पोलिसांनी निर्मल धमगाये, ममता धमगाये, तिलक उंदीरवाडे, नितीन धमगाये यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदी