शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

जिल्ह्यातील ५६३ कर्मचाऱ्यांनी दिली मंत्रालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:13 AM

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : राज्य सरकारी जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी गुरूवारी मुंबई येथील मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात गडचिरोली जिल्ह्यातील विविध विभागांचे ५६३ कर्मचारी सहभागी झाले होते.अंशदायी पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना लागू करा, सातवा वेतन आयोग ...

ठळक मुद्देजुनी पेन्शन योजना लागू करा : राज्यातील दोन लाख कर्मचारी सहभागी

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : राज्य सरकारी जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी गुरूवारी मुंबई येथील मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात गडचिरोली जिल्ह्यातील विविध विभागांचे ५६३ कर्मचारी सहभागी झाले होते.अंशदायी पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना लागू करा, सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करा, वेतन आयोगाची तत्काळ अंमलबजावणी करा, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता थकाबाकीसह विनविलंब द्या, रिक्त पदे भरा, पदांच्या कपातीचे धोरण रद्द करा, अनुकंपा तत्वावर पूर्वीप्रमाणेच नेमणूका करण्यात याव्या, महिला कर्मचाºयांच्या दोन वर्षांची बालसंगोपन रजा मंजूर करा, पाच दिवसांचा आठवडा लागू करा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करा आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. मार्चानंतर आझाद मैदानावर सभा आयोजित करण्यात आली.मोर्चाला आमदार कपील पाटील, विक्रम काळे, ना.गो.गानार संबोधित केले. मोर्चाचे नेतृत्व राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे निमंत्रक र.ग.कर्णिक, अध्यक्ष गजानन शेटे, मिलींद सरदे, अविनाश दौंड , विश्वास काटकर, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे उमेशचंद्र चिलबुले, अशोक थुल,शिक्षक समितिचे अध्यक्ष शिंदे, भाऊसाहेब पठान, ग.दी.कुलथे, ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष एकनाथराव ढाकने यांनी केले.या महामोर्चात राज्यभरातील दोन लाख कर्मचारी सहभागी झाले गडचिरोली जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, सरचिटणीस दुधराम रोहनकर, उपाध्यक्ष संजय खोकले, ग्राम सेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपुरकर, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार, राजु रेचनकार, डॉ. विजय उईके, अर्चना श्रिगीरवार, जिवनदास ठाकरे, मोनाक्षी डोह, श्रीकृष्ण मंगर, हेमंत गेडाम यांच्या नेतृत्वात ५६३ कर्मचारी सहभागी झाले.