शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

५५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

By admin | Updated: February 8, 2017 02:27 IST

पहिल्या टप्प्यात होणाऱ्या आठ तालुक्यांमधील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज मागे घेण्याचा मंगळवार

३९ उमेदवारांचे अर्ज बाद : जिल्हा परिषदेचे २२२ तर पंचायत समितीचे ३३६ उमेदवार कायम गडचिरोली : पहिल्या टप्प्यात होणाऱ्या आठ तालुक्यांमधील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज मागे घेण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस होता. जिल्हाभरातील एकूण ३९ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे १६ तर पंचायत समितीच्या २३ उमेदवारांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ३५ जिल्हा परिषद क्षेत्रांसाठी २२२ तर ७० पं.स. गणासाठी ३३६ उमेदवार असे एकूण ५५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गडचिरोली तालुक्यात पाच नामांकन मागे गडचिरोली तालुक्यातील मुरमाडी-मौशीखांब जि.प. क्षेत्रातील पुनम भैसारे, विहिरगाव जेप्रा क्षेत्रातील प्रकाश खोब्रागडे व मुडझा येवली जि.प. क्षेत्रातील प्रतीभा चौधरी यांनी नामांकन मागे घेतले आहे. मौशीखांब पंचायत समिती गणातून श्रीकांत काथोटे, गोकुलदास झोडगे यांनी नामांकन मागे घेतले आहे. जि.प.च्या पाच क्षेत्रासाठी ३८ तर १० गणांसाठी ५१ उमेदवार रिंगणात आहेत. देसाईगंज तालुक्यात नऊ नामांकन मागे देसाईगंज तालुक्यातील विसोरा-सावंगी क्षेत्रातून गुणवंत शिवकुमार नाकाडे, मारोती बगमारे, राहूल घोरमोडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. कोरेगाव-डोंगरगाव क्षेत्रातून सुधीर दोनाडकर, विजय बुल्ले यांनी नामांकन मागे घेतले आहेत. डोंगरगाव पंचायत समिती गणातून महेंद्र सोनपिपरे, कुरूड गणातून श्रेया भर्रे, डोंगरगाव गणातून अरविंद वालदे, सावंगी गणातून रत्नमाला गेडाम यांनी नामांकन मागे घेतले आहेत. तीन जि.प. क्षेत्रासाठी २४ तर सहा पं.स. गणासाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. आरमोरी तालुक्यात एक नामांकन मागे आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव-इंजेवारी जिल्हा परिषद क्षेत्रातून उमेदवारी भरलेल्या रत्नमाला तुळशीराम महाजन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अरसोडा-पळसगाव जि.प. क्षेत्रातील उमेदवारांनी अपील केली असल्याने या क्षेत्रातील उमेदवारी अर्ज १० फेब्रुवारीपर्यंत मागे घेतले जाणार आहेत. चार जि.प. क्षेत्रासाठी २४ तर आठ पं.स. गणासाठी ३७ उमेदवार रिंगणात आहेत. चामोर्शी तालुक्यात आठ उमेदवारांचे नामांकन मागे चामोर्शी तालुक्यातील विसापूर रै.-कुरूळ क्षेत्रातील रासपच्या उमेदवार मुरकुटे वर्षा राकेश, घोट-सुभाषग्राम क्षेत्रातील अपक्ष उमेदवार भोयर एसकुमार धोंडू यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. कुनघाडा रै पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार भांडेकर वर्षा आनंद, भांडेकर वामन जानकीराम, तळोधी गणातून सुरजागडे विजय नक्टू, फराळा गणातील काँग्रेसच्या उमेदवार बोरूले मंजुषा विठ्ठल, लखमापूर बोरी गणातून रासप उमेदवार बांबोळे, प्रविण रूपचंद, दुर्गापूर गणातून अपक्ष उमेदवार पोटवार भाग्यश्री दिलीप यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. विक्रमपूर-फराडा, हळदवाही-रेगडी, दुर्गापूर-वायगाव, आष्टी-इल्लूर या चार क्षेत्रातील उमेदवारांनी अपील केली आहे. त्यामुळे त्यांचे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत १० फेब्रुवारीपर्यंत आहे. सद्य:स्थितीत नऊ जि.प. क्षेत्रासाठी ६८ तर १८ गणांसाठी ९६ उमेदवार रिंगणात आहेत. कुरखेडात सहा नामांकन मागे कुरखेडा तालुक्यातील तळेगाव-वडेगाव जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवार नरेंद्र यादवराव तिरणकर, गेवर्धा-गोठणगाव गणातील अपक्ष उमेदवार योगीराज बगाजी टेंभुर्णे या दोघांनी नामांकन अर्ज मागे घेतले आहेत. पुराडा गणातील तिर्थराम मोतीराम रोकडे, तळेगाव गणातील मोरेश्वर श्रीराम लोणारे, कढोली गणातील ज्योत्सना गजानन टेकाम, अंगारा गणातील कपील देवराव पेंदाम या चार उमेदवारांनी नामांकन मागे घेतले आहेत. पाच जि.प. क्षेत्रांसाठी २२ तर १० पं.स. गणासाठी ४३ उमेदवार रिंगणात कायम आहेत. धानोरात सात अर्ज मागे धानोरा तालुक्यात चातगाव-कारवाफा जिल्हा परिषद क्षेत्रातून उमेदवारी अर्ज भरलेले ज्ञानेश्वर नामदेव मडावी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मुरूमगाव पं.स. गणातील शिवप्रसाद रामसाय गर्वणा, चातगाव गणातून रघुनाथ लोहंबरे, जगन्नाथ राजगडे, गिरीधर मेश्राम, गजानन मेश्राम, कारवाफा गणातील नलूताई नमनुरवार यांनी अर्ज मागे घेतला आहे. चार जि.प. क्षेत्रासाठी २५ तर आठ पं.स. गणासाठी ३० उमेदवार रिंगणात आहेत. कोरचीत एक नामांकन मागे कोरची तालुक्यातील बेडगाव पं.स. गणातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सिंद्राम नलिनी रमेश यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. जि.प.साठी १० तर पं.स.मध्ये २२ उमेदवार कायम आहेत. मुलचेरा तालुक्यात दोन नामांकन मागे कालिनगर-विवेकानंदपूर जि.प. गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पुष्पा युध्दिष्ठीर बिश्वास यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. कोठार शांतीग्राम जि.प. गटातून भाग्यश्री धर्मरावबाबा आत्राम यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पंचायत समिती गणातून मात्र एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. तालुक्यात आता जि.प.साठी ११ तर पं.स.साठी २१ उमेदवार रिंगणात आहेत. (प्रतिनिधी) छाननी दरम्यान १३ नामांकन अवैध भामरागड : अहेरी उपविभागात समाविष्ट असलेल्या भामरागड येथे जिल्हा परिषदेच्या दोन व पंचायत समितीच्या चार गणांसाठी अनुक्रमे ११ व २० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. तेथे मंगळवारी छाननी प्रक्रिया पार पडली. यावेळी दोघांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आले. यात गट क्रमांक ४० आरेवाडा-नेलगुंडा मधून काँग्रेसकडून लढणारे सुरेश सोनू सिडाम यांचा उमेदवारी अर्ज तिसऱ्या अपत्याच्या कारणामुळे रद्द करण्यात आला आहे. लता सुधाकर बोगामी यांनी अपक्ष म्हणून नेलगुंडा पं. स. गणासाठी नामांकन अर्ज दाखल केला होता. त्यांच्या घरी शौचालय नसल्याचा आक्षेप