शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
5
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
6
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
7
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
8
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
9
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
10
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
11
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
12
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

५५ नवीन बाधित तर २६ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 05:00 IST

शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या २६ रुग्णांमध्ये गडचिरोलीतील १४, चामोर्शी १, भामरागड १, कोरची ३, अहेरी २ आणि देसाईगंज येथील ५ जणांचा समावेश आहे. नव्याने समाविष्ठ झालेल्या ५५ बाधितांमध्ये गडचिरोलीतील २४, देसाईगंज येथील ७, चामोर्शी २, आरमोरी ३, धानोरा २, कोरची २, मुलचेरा १, कुरखेडा २, सिरोंचा ४, अहेरी २ आणि एटापल्लीतील ६ जणांचा समावेश आहे.

ठळक मुद्देदेसाईगंजमधील एकाचा मृत्यू : एकूण बाधित झाले १ हजार ८९६, सर्वाधिक गडचिरोलीतील

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात आज २६ जण कोरोनामुक्त झाले असताना नवीन ५५ बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील क्रियाशिल कोरोनारुग्णांची संख्या ५६५ झाली आहे. देसाईगंज येथील एका महिला कोरोनारुग्णाच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी घेण्यात आली. त्यामुळे एकूण मृत्यूसंख्या ८ वर पोहोचली आहे.आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ८९६ वर गेली असून पुढील दोन दिवसात दोन हजारांचा पल्ला गाठण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी १ हजार ३२३ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या २६ रुग्णांमध्ये गडचिरोलीतील १४, चामोर्शी १, भामरागड १, कोरची ३, अहेरी २ आणि देसाईगंज येथील ५ जणांचा समावेश आहे. नव्याने समाविष्ठ झालेल्या ५५ बाधितांमध्ये गडचिरोलीतील २४, देसाईगंज येथील ७, चामोर्शी २, आरमोरी ३, धानोरा २, कोरची २, मुलचेरा १, कुरखेडा २, सिरोंचा ४, अहेरी २ आणि एटापल्लीतील ६ जणांचा समावेश आहे.नवीन बाधित गडचिरोलीच्या रुग्णांमध्ये सोनापूर कॉम्प्लेक्सचे ३, गोकुळनगर ३, धुंडेशिवणी, पार्डी कुपी, हनुमान वार्ड, सुयोगनगर नवेगाव, रामपुरी वार्ड, महिला महाविद्यालय, सी-६० जवान, वनश्री कॉलनी, जिल्हा रूग्णालय, रामनगर वार्ड नं.८, सद्गुरू नगर नगर परिषदजवळ, आनंद नगर, सेमाना रस्ता, तसेच ब्रह्मपुरी व मूल येथील रुग्ण आहेत. देसाईगंज येथील ७ जणांमध्ये एसआरपीएफ ७, अहेरी २, सिरोंचा ४ यात आरोग्य कर्मचारी २, इतर २, आरमोरी ३, चामोर्शी २, हनुमान वार्ड १, येनापूर १, धानोरा येथील सीआरपीएफ २, एटापल्लीच्या ६ मध्ये सीआरपीएफ ४, आरोग्य कर्मचारी १, तसेच कोरची येथील २, मुलचेरा १ व कुरखेडा येथील २ जणांचा समावेश आहे.७३ टक्के पुरूष तर २७ टक्के महिला बाधितजिल्ह्यात आतापर्यंत प्रतिलक्ष ३ हजार ९९७ तपासण्या केल्या गेल्या. त्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा रेट ४.२९ टक्के तर निगेटिव्ह रेट ९४.७१ टक्के आहे. पुरुष ७३ टक्के तर महिलांचे प्रमाण २७ टक्के आहे. सद्या ५३७ क्रियाशिल रुग्ण असून त्यांची टक्केवारी एकूण बाधितांच्या २९ टक्के आहे. मृत्यू ८ असून त्याची टक्केवारी ०.४३ म्हणजे आर्ध्या टक्क्याहून कमी आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी मृत्यूदर गडचिरोलीत आहे. चाचण्यांच्या बाबतीतही जिल्हा आघाडीवर आहे. डबलिंग रेट जिल्ह्यात १७.९ असून या महिन्यात रुग्ण वाढल्याने प्रतिदिन ४० च्या प्रमाणात संख्या वाढत आहे.जनता कर्फ्यू करणार की नाही?जिल्ह्याच्या सर्व भागात नाही तरी किमान शहराच्या हद्दीत ‘जनता कर्फ्यू’ पाळून कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्याची गरज आहे. अनेक दुकानदार त्याबाबतची प्रतीक्षा करत आहेत. मात्र त्यासाठी कोणीच पुढाकार घेताना दिसत नाही. काही व्यापाऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. मात्र अद्याप जनता कर्फ्यूसंदर्भात निर्णय झालेला नाही.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDeathमृत्यू