पोलीस अधीक्षकांचे आवाहन : स्वप्न साकारण्यासाठी कष्टाची गरजगडचिरोली : केवळ पैशाच्या भरवशावर जीवनात यशस्वी होऊन मोठ्या पदावर जाता येत नसून त्यासाठी अफाट कष्ट व जिद्दीची गरज असल्याचे प्रतिपादन गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले. आदर्श मित्रमंडळ पुणे, रोटरी क्लब कात्रज, गडचिरोली पोलीस दल व लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहर पोलीस ठाण्यात ‘प्रोजेक्ट भरारी’ अंतर्गत ५० नक्षलपीडित व गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप, लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहूल खाडे, ठाणेदार उमेश बेसरकर, विकास राजुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान दुर्गम भागातील ५० विद्यार्थ्यांना सायकलचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये ३७ मुलींचा समावेश आहे. यावेळी मार्गदर्शन करताना उदय जगताप म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीच्या अंगात एकतरी कला असते, ती शोधून तिचा वापर चांगल्या कामासाठी करण्याचे कौशल्य विकसित केले पाहिजे. नक्षलपीडित व दुर्गम भागातील विद्यार्थी व युवकांना यापुढेही आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. श्रीनिवास सुंचूवार यांनी मार्गदर्शन करताना, गडचिरोली जिल्ह्यातील युवकांमध्ये बुध्दीमतेची कमतरता नाही. मात्र तिचा विकास करणे गरजेचे आहे. त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याचा विकास करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. प्रास्ताविकादरम्यान एसडीपीओ डॉ. राहूल खाडे यांनी आदर्श मित्र मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करून अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी इतर संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन केले. संचालन जनसंपर्क अधिकारी तेजस्वी पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांना आणखी मदत मिळणारज्या विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले आहे. त्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती दिसून आल्यास त्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च या संस्थेच्या वतीने उचलण्यात येणार आहे, अशी माहिती उदय जगताप जगताप यांनी दिली. पुणे येथील स्वयंसेवी संस्थेने राज्याच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलपीडित मुलांसाठी हा उपक्रम राबविला. या उपक्रमापासून इतर स्वयंसेवी संस्थांनी बोध
नक्षलपीडित कुटुंबातील ५० विद्यार्थ्यांना मिळाली सायकल
By admin | Updated: July 7, 2015 01:18 IST