शहरं
Join us  
Trending Stories
1
मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
2
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
3
"माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
4
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
5
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
7
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
8
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
9
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...
10
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
11
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
12
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
13
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
14
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
15
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
16
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
17
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
18
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
19
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
20
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?

५० किलो प्लास्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 01:38 IST

नगर परिषदेच्या पथकाने गडचिरोली शहरातील दुकानांमध्ये मंगळवारी धाड टाकून बंदी असलेले सुमारे ५० किलो प्लास्टिक जप्त केले आहे.

ठळक मुद्देगडचिरोलीत कारवाई : नगर परिषदेच्या स्वतंत्र पथकामार्फत दुकानांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगर परिषदेच्या पथकाने गडचिरोली शहरातील दुकानांमध्ये मंगळवारी धाड टाकून बंदी असलेले सुमारे ५० किलो प्लास्टिक जप्त केले आहे.प्लास्टिकचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन राज्य शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची प्लास्टिक व इतर काही प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घातली आहे. ही बंदी २३ जूनपासून लागू करण्यात आली. गडचिरोली नगर परिषदेने प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यास सोमवारपासून सुरुवात केली आहे. सोमवारी पहिल्या दिवशी शहरातील काही दुकानांना प्लास्टिक बंदीबाबतचे नोटीस चिपकविले. त्यानंतर मंगळवारपासून नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या पथकाने कारवाईस सुरुवात केली. मंगळवारी नगर परिषद समोरची दुकाने, आरमोरी मार्ग तसेच मुख्य बाजारपेठेतील काही दुकाने, फळविक्रेते व इतर विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. या दुकानांमध्ये ५० किलो प्लास्टिक आढळून आली. दुकानांमध्ये आढळलेली प्लास्टिक जप्त करण्यात आली आहे. ज्या दुकानदाराकडे प्लास्टिक आढळली, त्यांच्या दुकानाचे नाव नोंदवून यानंतर प्लास्टिकचा वापर न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सद्या प्लास्टिक जप्ती व जनजागृती केली जात आहे. चार ते पाच दिवसानंतर दंडात्मक कारवाईला सुरुवात होईल, अशी माहिती पथकातील कर्मचाºयांनी दिली.पथकामध्ये पाणीपुरवठा पर्यवेक्षक नितीन गौरखेडे, नितेश सोनवाने, दिनेश धोटे, किशोर ठेमस्कर, श्यामराव खोब्रागडे, वासुदेव अंबादे, संजय मारगोनवार, लोमेश मेश्राम, वाळके, भांडेकर आदी नगर परिषद कर्मचाºयांचा समावेश आहे.सध्या जनजागृतीवर भरप्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करताना नगर परिषदेने सर्वप्रथम जनजागृतीवर भर दिला आहे. मंगळवारी काही दुकानदारांकडील प्लास्टिक जप्त केली. बुधवारी मुख्य बाजारपेठ व चामोर्शी मार्गावरील दुकानांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीचा उपक्रम आणखी दोन ते तीन दिवस चालणार आहे. एखाद्या दुकानदाराकडे प्लास्टिक आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई न करता केवळ त्याला सूचना दिल्या जात आहेत. त्यानंतर मात्र प्लास्टिक आढळून आल्यास शासनाच्या नियमाप्रमाणे दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पथकातील कर्मचाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी