शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

४७ दुधाळू जनावरे गट मंजूर

By admin | Updated: March 15, 2015 01:11 IST

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध लाभार्थ्यांना दुधाळू गाई-म्हशींचे वाटप २०१४-१५ यावर्षात केले जाणार आहे.

गडचिरोली : राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध लाभार्थ्यांना दुधाळू गाई-म्हशींचे वाटप २०१४-१५ यावर्षात केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ४७ लाभार्थ्यांना दुधाळू जनावरांचे गट मंजूर करण्यात आले आहे. यात ३० टक्के महिला लाभार्थ्यांची प्राधान्याने निवड करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार यांनी दिली आहे.शेती हंगामात शेतमालाचे उत्पन्न करून मिळेल त्या भावात विक्री करून आपले जीवन न जगता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांकडून बोध घेऊन दुग्ध व्यवसायातून आपली प्रगती करावी, याकरिता सदर दुधाळू जनावर गट मंजूर करण्यात आले आहे. गडचिरोली तालुक्यात नऊ लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले. यापैकी चार लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. तर चार लाभार्थ्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. आरमोरी तालुक्यातील १५ लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले. यापैकी तीन लाभार्थ्यांची निवड झाली. तर तीन प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. चामोर्शी तालुक्यात १८ प्रस्ताव प्राप्त झाले. पैकी चार लाभार्थ्यांची निवड तर चार लाभार्थी प्रतीक्षा यादीत, धानोरा तालुक्यात सहा प्रस्ताव प्राप्त, चार जणांची निवड, दोन जणांचा प्रतीक्षा यादीत समावेश करण्यात आला. मुलचेरा तालुक्यात आठ प्रस्ताव प्राप्त, एकाची निवड तर एक प्रतीक्षा यादीत, भामरागड तालुक्यात १० प्रस्ताव प्राप्त, दोन लाभार्थ्यांची निवड तर दोन प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. कुरखेडा तालुक्यात १३ प्रस्ताव प्राप्त, तीन लाभार्थ्यांची निवड तर तीन जणांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. कोरची तालुक्यात दोन प्रस्ताव प्राप्त, एकाची निवड तर एक प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. देसाईगंज तालुक्यात सात प्रस्ताव प्राप्त, तीन लाभार्थ्यांची निवड तर तीन प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. अहेरी तालुक्यात १६ लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त, आठ जणांची निवड तर आठ लाभार्थ्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले.एटापल्ली तालुक्यात ११ प्रस्ताव प्राप्त, दोन जणांची निवड तर दोन जणांना प्रतीक्षा यादीत, सिरोंचा तालुक्यात २५ लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त, १२ लाभार्थ्यांची निवड तर १२ लाभार्थ्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जागृत होऊन अधिकाधिक लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, शासनाकडे अधिकच्या निधीकरिता पाठपुरावा करून शेतकरी, शेतमजूर व गरजू लोकांना योजनेचा लाभ देता येईल. त्यामुळे नागरिकांनी जागृत व्हावे, असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, जि. प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बुरले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आशा गेडाम, पशुधन विकास अधिकारी डॉ. रामटेके यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)