शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

जूनमध्ये ४६९ मलेरिया रुग्ण; गडचिरोलीत चार तालुके अति जोखमीचे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 16:44 IST

कोरडा दिवस पाळा, धोका टाळा : भामरागड तालुक्यात सर्वाधिक उद्रेक

दिलीप दहेलकरलोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पावसाळा आला की, विविध रोगांना आमंत्रण मिळते. घाणीचे साम्राज्य, घाण पाण्याचे डबके, तसेच डासांची वाढती उत्पत्ती आदी कारणांमुळे जिल्ह्यात मलेरियाचाही प्रकोप वाढतो. जून महिन्यात जिल्ह्यात तब्बल ४६९ रुग्ण मलेरिया पॉझिटिव्ह आढळून आले. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी चार तालुक्यांत अतिजोखमीची परिस्थिती आहे. 

पावसाळा आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे समीकरण ठरलेले आहे. पावसाळ्यात विविध प्रकारच्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. साचलेल्या पाण्यातून विविध आजार उ‌द्भवण्याचा धोका अधिक असतो. या दिवसांत डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढते. यापैकी मलेरिया ताप हा एक संसर्गजन्य आजार आहे, जो डासांमुळे होतो. या आजारामध्ये तीव्र तापासोबत इतरही काही लक्षणे दिसून येतात. मलेरिया झाला असता त्या व्यक्तीची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. भामरागड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाकडे नोंद आहे.

हे कायम लक्षात ठेवा..• मच्छरदाणी लावून नेहमी झोपणे.• मलेरियाची साथ असेल तर डास चावू नये म्हणून अंगभर कपडे घालणे. • डास चावू नये म्हणून प्रतिबंधात्मक क्रीम लावणे.• जंतुनाशक फवारणी सर्व ठिकाणी करून घेणे.• तापात हलका आहार घेणे आणि औषधांचा कोर्स पूर्ण करणे.

कोणते तालुके संवेदनशील?घाणीचे साम्राज्य, जंगलालगतच्या गावात हिवतापाच्या डासांची उत्पत्ती अधिक होते. परिणामी गडचिरोली जिल्हयातील चार तालुके हिवतापाच्या बाबतीत अधिक संवेदनशील आहेत. आरोग्य यंत्रणेची या तालुक्यातील गावांवर अधिक नजर असते. भामरागड, एटापल्ली, धानोरा व कोरची ही चार तालुके मलेरियाबाबतीत संवेदनशील आहेत. या तालुक्यातील पावसाळ्यात आढळून येणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या अधिक असते.

मलेरिया होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?पाणी साचू देऊ नका: ज्या ठिकाणी पाणी साचते त्या भागात डासांचे प्रमाण वाढते. जुने टायर, जुनी भांडी, कुंड्या यांमध्ये पाणी साचू देऊ नका. घराजवळील सांडपाण्याचा निचरा करणे, पाणी साठू न देणे हा उपाय आहे. ● पौष्टिक आहार घ्या: मलेरिया बाधीत व्यक्तींनी उच्च उष्मांकयुक्त आहार घ्यावा. तांदळाऐवजी गहू आणि बाजरीचे पदार्थ खावे. ताजी फळे आणि भाज्या खाणे देखील फायदेशीर ठरू शकते. बीट, गाजर, पपई, द्राक्ष, बेरी, संत्री यांसारख्या विटामिन 'ए' आणि विटामिन 'सी' समृद्ध फळे आणि भाज्या रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.● प्रथिनांचे प्रमाण वाढवा : मलेरियाच्या बाबतीत उतींचे प्रमाण झपाट्याने संपुष्टात येते, त्यामुळे प्रथिनांचे प्रमाण वाढवण्याची गरज असते. यासाठी उच्च कार्बोहायड्रेट आणि प्रथिनेयुक्त्त आहार फायदेशीर ठरु शकतो.● हे पदार्थ खाऊ नका: मलेरियाची लागण झाल्यानंतर हिरव्या पालेभाज्या, जाड साल असलेली फळे आणि संपूर्ण धान्य यांसारखे हाय फायबर असलेले पदार्थ खाणे टाळा. यासोबतच तळलेले, मैदा आणि अति गोड पदार्थ खाणे टाळावे.

जिल्ह्यात मलेरियाची लागण थांबवण्यासाठी यंत्रणेकडून पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. ज्या गावात तापाची साथ दिसते, अशा ठिकाणी आरोग्य कर्मचारी पोहोचून रक्त्तनमुने घेऊन निदान करीत आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांवर लागलीच औषधोपचार केला जात आहे. जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्याकडून सातत्याने हिवताप परिस्थिती व उपचार सुविधेचा आढावा घेतला जात आहे. कोणालाही ताप आला किवा थोडेसे लक्षणे दिसली की, संबंधितांनी तत्काळ आरोग्य कर्मचाऱ्यांकडून रक्ताची तपासणी करावी. पुजाऱ्याकडे न जाता रुग्णालयात जाऊन पूर्ण उपचार घ्यावे.- डॉ. पंकज हेमके, जिल्हा हिवताप अधिकारी, गडचिरोली. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली