शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे ४६ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शेतकऱ्यांनी वीज बिलाचा भरणा करावा, यासाठी शासनाने सवलतीच्या विविध योजना राबविल्यानंतरही जिल्ह्यातील जवळपास १९ ...

ठळक मुद्दे२० हजार शेतकरी : महिन्याला सव्वा कोटी युनिट विजेचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांनी वीज बिलाचा भरणा करावा, यासाठी शासनाने सवलतीच्या विविध योजना राबविल्यानंतरही जिल्ह्यातील जवळपास १९ हजार शेतकऱ्यांकडे ४५ कोटी ८९ लाख ३१ हजार १९६ रुपयांची थकबाकी आहे. विशेष म्हणजे दुष्काळी परिस्थिती असताना अद्याप शेतकऱ्यांकडून वीज बिलाची थकबाकी सक्तीने वसूल न करण्याबाबत कोणताही आदेश मिळालेला नाही.गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील कन्नमवार जलाशय वगळता एकही मोठा सिंचन प्रकल्प नाही. मामा तलाव, बोड्यांच्या माध्यमातून खरीप हंगामातील धानपिकाला आकस्मिक स्थितीत सिंचन उपलब्ध होते. सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना अनुदानावर सिंचन विहिरी, शेततळे उपलब्ध करून दिले. विहिरींमध्ये कृषिपंप लावून सिंचन करण्यासाठी वीज पुरवठा व कृषिपंपांची मागणी वाढली. शासनानेही शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांच्या शेतापर्यंत वीज खांब नेऊन पोहोचले. परंतू त्या वीज बिलाची रक्कम नियमितपणे भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण १९ हजार ८१४ वीज कृषिपंपधारक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना शासनामार्फत अत्यंत कमी दरात वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाते. जिल्हाभरातील शेतकरी दर तीन महिन्याला जवळपास सव्वा कोटी युनिट विजेचा वापर करतात. तीन महिन्याचे बिल जवळपास तीन ते साडेतीन कोटीच्या जवळपास राहते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे जुनी थकबाकी ३४ कोटी ८५ लाखांवर पोहोचली आहे. शेतकºयांनी थकीत वीज बिल भरावे, यासाठी शासनाने विविध योजना राबविल्या. मात्र शेतकऱ्यांकडे थकीत वीज बिल कायम आहे. उलट वीज बिलाचा आकडा वाढतच चालला आहे. भविष्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.नव्याने सत्तारूढ महाराष्ट्र आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काय-काय करणार याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकºयांना सवलतीच्या दरात वीज देण्यासोबतच शेतमालाला भाव देण्याची गरज व्यक्त होत आहे.व्याज पोहोचले ११ कोटींवरमहावितरणच्या नियमानुसार वीज बिल थकीत असेल तर त्यावर काही प्रमाणात व्याज आकारले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे सप्टेंबर महिन्यापर्यंत सुमारे ३४ कोटी ८५ लाख २१ हजार रुपयांची थकबाकी होती. या थकबाकीवर सुमारे ११ कोटी ४ लाख ९ हजार रुपयांचे व्याज झाले आहे. काही शेतकऱ्यांनी मागील तीन ते चार वर्षांपासून वीज बिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे त्यांच्याकडील थकबाकी व त्यावरील व्याज वाढतच चालला आहे.दुष्काळामुळे वीज बिल वसुली रखडलीखरीप हंगामातील धानपीक भरण्याच्या मार्गावर असताना जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. अनेकांच्या शेतात पाणी शिरल्याने धानपिकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांचा थकीत वीज बिलासाठी वीज पुरवठा खंडित करणे योग्य होणार नसल्याने वीज पुरवठा खंडित करण्याचे धोरण काही काळ लांबणीवर टाकले असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र जे शेतकरी वीज बिल भरणार आहेत, त्यांच्याकडून वीज बिल स्वीकारले जाणार आहे.

टॅग्स :electricityवीजagricultureशेती