४१ युवकांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:28 AM2020-12-25T04:28:33+5:302020-12-25T04:28:33+5:30
कोरची/चामाेर्शी : जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा याेजना विभाच्या वतीने काेरची व चामाेर्शी येथे रक्तदान शिबिर घेण्यात ...
कोरची/चामाेर्शी : जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा याेजना विभाच्या वतीने काेरची व चामाेर्शी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण ४१ जणांनी रक्तदान केले. कोरची येथे ब्लड डोनर ग्रुपतर्फे पारबताबाई विद्यालयात मंगळवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ३३ जणांनी रक्तदान केले. तसेच याप्रसंगी रक्तदाब, रक्तगट तसेच हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली. शिबिराच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी आबाजी आत्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक नसरुद्दीन भामानी, मनोज अग्रवाल, नंदकिशोर वैरागडे, मुख्याध्यापक शालिकराम कराडे, डॉ. किशोर ताराम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी, राहूल अंबादे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूरज हेमके, संचालन आशिष अग्रवाल तर आभार प्राध्यापक दादाजी चाहारे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जितेंद्र सहारे, अभिजीत निंबेकर, कृष्णा वंजारी, भूमेश शेंडे, रवी बावणे, प्रा. विनायक चापले, वनश्री महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले. चामाेर्शी येथील कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा याेजना विभाग व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात आठ जणांनी रक्तदान केले. यामध्ये राकेश मुनगेलवार, सुप्रिया गरमळे, विशाल माळवे, दत्तू काेहळे, प्रशांत गव्हारे, प्रणय नैताम आदी विद्यार्थ्यांचा समावेश हाेता. रक्तसंकलनाचे काम जिल्हा सामान्य रुग्णालयातील डाॅ. सुनीता साखरे, सतीश तडकलावार, मुर्लीधर पेद्दीवार यांनी केले तर यशस्वीतेसाठी रासेयाे कार्यक्रम अधिकारी डाॅ. राजेंद्र झाडे, प्रा. संजय म्हस्के, प्रा. वंदना थुटे, चंदू राठाेड, नीलेश कुनघाडकर, देवाजी धाेडरे, अश्विनी भिसे, अक्षय पिपरे यांनी सहकार्य केले.