शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

४० हजार क्विंटल धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

आदिवासी विकास महामंडळामार्फत कोरची व कुरखेडा तालुक्यात एकूण १४ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या धान खरेदी केंद्रामार्फत ३ लाख ६ हजार ५२७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्यापैकी केवळ ४५ हजार ६१० क्विंटल धानाची उचल करून भरडाई झाली. उर्वरित धान सहकारी संस्थेच्या गोदामात तर काही धान उघड्यावर ताडपत्री झाकून ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देउन्हाळी धान खरेदीस अडचण : कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : पावसाळा तोंडावर आला असतानाही अजूनपर्यंत कोरची तालुक्यातील बेतकाठी, कोटगूल, बेडगाव या केंद्रांवरील जवळपास ४० हजार क्विंटल धानाची उचल करण्यात आली नाही.आदिवासी विकास महामंडळामार्फत कोरची व कुरखेडा तालुक्यात एकूण १४ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या धान खरेदी केंद्रामार्फत ३ लाख ६ हजार ५२७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्यापैकी केवळ ४५ हजार ६१० क्विंटल धानाची उचल करून भरडाई झाली. उर्वरित धान सहकारी संस्थेच्या गोदामात तर काही धान उघड्यावर ताडपत्री झाकून ठेवण्यात आले आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात धानाचे उत्पादन चांगले झाले. तसेच शासनाने प्रती क्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केले होते. शासकीय खरेदी केंद्रावर मिळणारा भाव खासगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत अधिक असल्याने शेतकऱ्यांनी ठोकळ धानाबरोबरच बारीक धानही विक्रीसाठी आणला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी झाली. आदिवासी विविध कार्यकारी संस्थांचे गोदाम फुल्ल झाल्याने उघड्यावरच ताडपत्री झाकून धान ठेवण्यात आले आहे. कोरची तालुक्यातील मसेली, कोरची, बेतकाठी, मर्केकसा, बोरी, कोटरा, बेडगाव, कोटगूल आदी केंद्रांवरील धान पडून आहे.येत्या १५ दिवसांत पावसाला सुरूवात होणार आहे. पावसामुळे उघड्यावर ठेवलेले धान भिजून खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. धान भिजल्यास आदिवासी विकास महामंडळाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. चार वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांचे धान फेकून द्यावे लागले. विशेष म्हणजे कोरची तालुक्यातील काही शेतकरी उन्हाळी धानाची लागवड करतात. अजूनपर्यंत खरिपाच्या धानाची उचल झाली नसल्याने उन्हाळी धान खरेदी करण्यास आदिवासी विविध कार्यकारी संस्थांनी नकार दिला आहे. खरीपाच्या धानाची लवकर उचल करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड