शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

१४ केंद्रांवर चार हजार क्विंटल धानाची आवक

By admin | Updated: November 17, 2016 02:05 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत सन २०१६-१७ च्या खरीप हंगामासाठी

६८ लाख ६७ हजारांची खरेदी : आदिवासी विकास महामंडळामार्फत संस्थांचे २० केंद्र सुरूगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत सन २०१६-१७ च्या खरीप हंगामासाठी एकूण ५५ धान खरेदी मंजूर करण्यात आली असून आतापर्यंत २० केंद्र सुरू करण्यात आले आहे. यापैकी १४ केंद्रांवर धानाची आवक सुरू झाली असून आतापर्यंत या केंद्रांवर ६८ लाख ६७ हजार रूपये किमतीच्या ४ हजार ६७२ क्विंटल धानाची खरेदी झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत सहकारी संस्थांकडून दरवर्षी रब्बी व खरीप हंगामात कोट्यवधी रूपयांच्या धानाची खरेदी केली जाते. गतवर्षी सन २०१५-१६ च्या हंगामात गडचिरोली प्रादेशिक कार्यालयामार्फत सहकारी संस्थांचे एकूण ४२ केंद्र मंजूर करण्यात आले होते. मात्र यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने धानाचे उत्पादन भरघोस येणार या शक्यतेने महामंडळातर्फे अधिकाधिक धान केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या यंदाच्या खरीप हंगामात धानाची आवक झालेल्या धान खरेदी केंद्रांमध्ये कुरखेडा तालुक्यातील कढोली, कोरची तालुक्यातील मर्केकसा, रामगड, पुराडा, मालेवाडा, ेयेंगलखेडा तसेच आरमोरी तालुक्यातील अंगारा, देलनवाडी, दवंडी, कुरंडी माल, पिंपळगाव, मौशीखांब या धान खरेदी केंद्राचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील धानोरा तसेच आदिवासी विकास महामंडळामार्फत सुरू झालेल्या घोट येथील केंद्राचा समावेश आहे. कढोली केंद्रावर १३९.८४ क्विंटल, मर्केकसा केंद्रावर ६८२ क्विंटल, रामगड केंद्रावर ३४० क्विंटल, येंगलखेडा ३४ क्विंटल, अंगारा केंद्रावर ३० क्विंटल, देलनवाडी केंद्रावर १५९९ क्विंटल, कुरंडी माल केंद्रावर २८८ क्विंटल, पिंपळगाव केंद्रावर १३४१ क्विंटल, मौशीखांब केंद्रावर ४ क्विंटल, धानोरा केंद्रावर ११४ क्विंटल, घोट केंद्रावर ७५८ क्विंटल धानाची खरेदी १५ नोव्हेंबरपर्यंत झाली आहे. गतवर्षी सन २०१५-१६ च्या खरीप व रब्बी हंगामात आदिवासी विकास महामंडळांतर्गत सहकारी संस्थांच्या वतीने जवळपास ३५ कोटी रूपयांची धान खरेदी करण्यात आली. या धान खरेदी प्रक्रियेत संबंधित सर्व शेतकऱ्यांना धान चुकाऱ्याची रक्कम व बोनसची रक्कम अदा करण्यात आली आहे. मात्र सहकारी संस्थांचे कमिशन प्रलंबित आहे. (स्थानिक प्रतिनिधी)